MS Dhoni : भाईजानच्या पार्टीत कॅप्टन कूलचा जलवा! सलमानच्या ६०व्या बर्थडेला धोनीची हजेरी, VIDEO व्हायरल

MS Dhoni attend Salman Khan Birthday Party : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या दोन वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे झारखंड क्रिकेटला ऐतिहासिक उंचीवर नेण्यामागे त्याचा मोलाचा वाटा असल्याचे समोर आले आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या ६० व्या वाढदिवसाच्या पार्टीतील त्याची उपस्थिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सलमानच्या ‘बर्थडे पार्टी’त धोनीची हजेरी –
आपले खाजगी आयुष्य प्रसिद्धीच्या झोतातून दूर ठेवणाऱ्या धोनीने नुकतीच पनवेल येथे आयोजित सलमान खानच्या ६० व्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. धोनी आपली पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा यांच्यासह या खाजगी पार्टीत पोहोचला होता. केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीयांसाठी असलेल्या या पार्टीतील धोनीचे व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून, ‘भाईजान’ आणि ‘कॅप्टन कूल’ यांच्यातील मैत्रीचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत.
झारखंड क्रिकेटचा ‘मेंटॉर’ –
60 ఏళ్లు వచ్చినా ‘భాయ్’ ఛరిష్మా మాత్రం తగ్గలేదు!
మీడియా ప్రతినిధుల సమక్షంలో ఘనంగా సల్మాన్ ఖాన్ 60వ పుట్టినరోజు వేడుకలు…#SalmanKhan #HappyBirthdaySalman #SalmanKhanBirthday #Bhaijaan pic.twitter.com/9lS1DdSnzT— Telangana365 (@Telangana365) December 27, 2025
केवळ पार्ट्यांमध्येच नव्हे, तर क्रिकेटच्या मैदानावरही धोनीची सक्रियता कायम आहे. ४४ वर्षीय धोनी सध्या झारखंड क्रिकेटला मजबूत करण्यासाठी पडद्यामागून मोठी भूमिका बजावत आहे. झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनचे (JSCA) सह-सचिव शाहबाज नदीम यांनी नुकताच याचा खुलासा केला. नदीम यांच्या मते, धोनी केवळ टीमच्या हालचालींवर लक्ष ठेवत नाही, तर कोचिंग स्टाफची नियुक्ती आणि धोरणात्मक निर्णयातही महत्त्वाचे मार्गदर्शन करतो.
#WATCH | Maharashtra | Former Captain of the Indian Cricket Team Mahendra Singh Dhoni leaves after attending actor Salman Khan’s 60th birthday party at Panvel. pic.twitter.com/Sb7XA186Eo
— ANI (@ANI) December 26, 2025
हेही वाचा – IND W vs SL W : भारताने सलग तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत मालिका घातली खिशात
नदीम यांनी सांगितले की, “धोनीला झारखंडच्या प्रत्येक देशांतर्गत खेळाडूची आकडेवारी तोंडपाठ आहे. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर त्याचे बारीक लक्ष होते.” विशेष म्हणजे, झारखंडने हरियाणाचा पराभव करून पहिल्यांदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला, ज्यामागे धोनीचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.
हेही वाचा – AUS vs ENG : आऊट की नॉट आऊट? लाबुशेनच्या विकेटवरुन पेटला वाद, रुटने घेतलेल्या कॅचचा VIDEO व्हायरल
आयपीएल २०२६ आणि भविष्य –
Finally a picture of #SalmanKhan & #MSDhoni together from tonight’s party! I can relax now. #HappyBirthdaySalmanKhan pic.twitter.com/iHazCzjQw6
— Shweta SK (@Shweta7770) December 26, 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी आजही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) अविभाज्य भाग आहे. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा दरवर्षी होत असल्या तरी, तो आगामी हंगामातही पिवळ्या जर्सीत मैदानात उतरून चाहत्यांचे मनोरंजन करेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.





