FIH Hockey5s Men’s World Cup 2024 : भारताचे आव्हान संपुष्टात, उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडनं केलं पराभूत…

FIH Hockey5s Men’s World Cup 2024 (India vs Netherland) : भारतीय पुरुष हॉकी संघाला FIH हॉकी 5s विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मोहम्मद राहिलच्या हॅट्ट्रिकनंतरही नेदरलँड्सने भारताचा 7-4 असा पराभव केला. आता पाचव्या ते आठव्या स्थानासाठी भारताचा सामना केनियाशी होणार आहे.
भारताकडून राहिलने पहिल्या, सातव्या आणि 25व्या मिनिटाला गोल केले. याशिवाय 11व्या मिनिटाला मनदीप मोरने गोल केला. नेदरलँड्ससाठी सँडर डी विजन (4 थ्या, 15व्या मिनिटाला) आणि अलेक्झांडर शॅप (10व्या, 26व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर लुकास मिडेन्डॉर्प (12व्या मिनिटाला), जेमी व्हॅन आर्ट (13 व्या मिनिटाला) आणि पेपिन रेयेंगा (20व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला.
𝐍𝐞𝐭𝐡𝐞𝐫𝐥𝐚𝐧𝐝𝐬 𝐚𝐫𝐞 𝐭𝐡𝐫𝐨𝐮𝐠𝐡 𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 𝐬𝐞𝐦𝐢-𝐟𝐢𝐧𝐚𝐥 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐅𝐈𝐇 𝐇𝐨𝐜𝐤𝐞𝐲𝟓𝐬 𝐌𝐞𝐧’𝐬 𝐖𝐨𝐫𝐥𝐝 𝐂𝐮𝐩!
Netherlands recover from three early deficits to register a fantastic win against India and become the first semi-finalists of the FIH… pic.twitter.com/WUAjtIsw9Y
— International Hockey Federation (@FIH_Hockey) January 30, 2024
सुरुवात होती चांगली,पण…
सामन्याची सुरुवात खूपच चांगली झाली आणि राहिलने पहिल्याच मिनिटाला भारतासाठी गोल केला. यानंतर सँडरने नेदरलँडसाठी बरोबरी साधली. भारताने प्रतिआक्रमण तीव्र केले आणि राहिलने सातव्या मिनिटाला लगेचच दुसरा गोल केला. दहाव्या मिनिटाला शॅपने बरोबरी साधली. पुढच्याच मिनिटाला मनदीपने पुन्हा भारताला आघाडी मिळवून दिली. नेदरलँड्सच्या मिडेन्डॉर्प आणि व्हॅन आर्टने गोल करून झटपट आक्रमण करणे सुरू ठेवले. मध्यंतरापूर्वी सँडरने दुसरा गोल करून नेदरलँड्सला चांगली आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात रेयेंगा आणि शॅपने आघाडी मजबूत केली. राहिलने 25व्या मिनिटाला हॅट्ट्रिक पूर्ण केली, पण तो भारताला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
जमैकाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक…
मनिंदर सिंगच्या चार गोलच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या पूल सामन्यात जमैकाचा 13-0 असा पराभव केला आणि FIH हॉकी 5 पुरुष विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
मनिंदर सिंगने दुसऱ्या मिनिटाला दोन गोल केल्यानंतर 28व्या आणि 29व्या मिनिटाला गोल केले. हे चारही मैदानी गोल होते. या सामन्यात मनजीत (5व्या आणि 24व्या मिनिटाला), राहिल मोहम्मद (16व्या आणि 27व्या मिनिटाला) आणि मनदीप मोर (23व्या आणि 27व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. तर उत्तम सिंग (पाचवे मिनिट), पवन राजभर (नववे मिनिट) आणि गुरजोत सिंग (14वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.





