FIDE Candidates 2024 : भारताच्या 17 वर्षीय डी. गुकेशने रचला इतिहास, कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकत मोडला 40 वर्षांचा विक्रम..

D Gukesh , FIDE Candidates 2024 : भारताच्या डी गुकेशने वयाच्या 17 व्या वर्षी कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. या विजयासह गुकेश कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक चॅम्पियनला आव्हान देणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. ( Gukesh makes history by becoming youngest-ever World Championship contender ) या विजयासह भारतीय स्टारने 40 वर्षे जुना विक्रम मोडला. आता गुकेशला या वर्षाच्या अखेरीस चीनच्या विद्यमान विश्वचषक विजेत्या डिंग लिरिनविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे.
गुकेशच्या आधी, सर्वात कमी वयात उमेदवार बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा विक्रम रशियाच्या गॅरी कास्पारोव्हच्या नावावर होता, जो 1984 मध्ये आपल्याच देशाच्या नतोली कार्पोव्हला आव्हान देण्यासाठी पात्र ठरला होता. त्यावेळी कास्परोव्ह 22 वर्षांचा होता. पण आता गुकेशने वयाच्या 17 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे.
🇮🇳 Gukesh exiting the venue after winning the 2024 #FIDECandidates! 🔥 🤩 pic.twitter.com/REZMIfOO9q
— International Chess Federation (@FIDE_chess) April 22, 2024
ही स्पर्धा ( Chess Candidates 2024 ) जिंकण्यासाठी गुकेशने शेवटच्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत ड्रॉ खेळला. गुकेशने स्पर्धेत 14 पैकी 9 गुण मिळवले. जागतिक विजेतेपदाला आव्हान देऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली जाते.
स्पर्धा जिंकल्यानंतर गुकेश म्हणाला, “खूप आनंद झाला. मी तो रोमांचक खेळ पाहत होतो (फॅबियो कारुआना आणि इयान नेपोम्नियाच्ची यांच्यातील लढत) आणि नंतर मी माझ्या सहकाऱ्यासोबत फिरायला गेलो, मला वाटते की त्याचा मला फायदा झाला.” गुकेश शेवटच्या फेरीपूर्वी गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. त्याची शेवटची फेरी ड्रा वर संपली, ज्यामुळे गुकेशला फॅबियो कारुआना आणि इयान नेपोम्नियाच्ची यांच्यातील सामन्याच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागली. 109 चालीनंतर, फॅबियो कारुआना आणि इयान नेपोम्नियाची यांच्यातील सामना देखील अनिर्णित (ड्राॅ) राहिला, ज्यामुळे गुकेश पहिल्या स्थानावर राहिला आणि त्याने स्पर्धा जिंकली.
स्पर्धा जिंकणारा ठरला दुसरा भारतीय…
उल्लेखनीय म्हणजे, डी गुकेश कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धा ( Chess Candidates 2024 ) जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. गुकेशच्या आधी भारताच्या विश्वनाथन आनंदने ही स्पर्धा जिंकली होती. गुकेशच्या या विजयानंतर विश्वनाथन आनंदने X वर लिहिले की, “सर्वात तरुण चॅलेंजर बनल्याबद्दल डी गुकेशचे अभिनंदन. तू जे काही साध्य केले त्याचा अभिमान आहे. मला वैयक्तिकरित्या खूप अभिमान आहे. या क्षणाचा आनंद घे.”





