Pune News : शुक्रवार पेठेत ‘कल्पतरू आयुर्वेद’वर छापा; ५० लाखांचा बेकायदेशीर भस्म व औषधसाठा जप्त
Pune News : शुक्रवार पेठेतील 'कल्पतरू आयुर्वेद' येथे एफडीए ने छापा टाकला. विनापरवाना साठवून ठेवण्यात आलेले भस्म व इतर औषधांचा सुमारे ५०.३६ लाख रुपयांचा साठा जप्त केला.

Pune News : शुक्रवार पेठेतील ‘कल्पतरू आयुर्वेद’ येथे एफडीए ने छापा टाकला. विनापरवाना साठवून ठेवण्यात आलेले भस्म व इतर औषधांचा सुमारे ५०.३६ लाख रुपयांचा साठा जप्त केला. (Pune News)
विनापरवाना भस्म व रस औषधांची विक्री होत असल्याची माहिती औषध निरीक्षकांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान प्लास्टिकच्या पिशव्या, बरण्या आणि बाटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भस्माचा साठा आढळून आला. (Pune News)
या साठ्यावरील बॅच क्रमांक, उत्पादन व मुदतबाह्यता तारीख, उत्पादकाचे नाव-पत्ता तसेच परवाना क्रमांक यांसारखी आवश्यक माहिती नमूद करण्यात आलेली नव्हती. (Pune News)
यावेळी आस्थापनाचे प्रमुख राकेश राजेंद्र शिर्के यांना संबंधित औषधांची खरेदी बिले किंवा मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता ते ती सादर करू शकले नाहीत. त्यामुळे संशयास्पद औषधसाठा जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत सुमारे ५०.३६ लाख रुपये असल्याचे एफडीए च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Pune News)
Pune News : स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन; ‘इराणी टी कॅफे’चा परवाना निलंबित





