South Africa Vs Afghanistan 1st ODI (FazalHaq Farooqi) : अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 18 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, या मालिकेतील पहिला सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. आफ्रिकन संघ या एकदिवसीय मालिकेत अनेक स्टार खेळाडूंशिवाय खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या होईल, अशी अपेक्षा असेल, मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी त्याच्या या अपेक्षेवर अक्षरशा: पाणी फेरले. अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेला 33.3 षटकात अवघ्या 106 धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेची अफगाणिस्तानविरुद्धची वनडे फॉरमॅटमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
अफगाणिस्तानचे वेगवान गोलंदाज फझलहक फारुकी आणि अल्लाह मोहम्मद गझनफर यांनी दक्षिण आफ्रिकेला अशाप्रकारे शरणागती पत्करण्यात मोलाची भूमिका बजावली. आपल्या संघाकडून फजलहक फारुकीने सर्वाधिक 4 बळी घेतले. अल्लाह मोहम्मद गझनफरने 3 फलंदाजांना बाद केले तर राशिद खानने दोन विकेट घेतल्या. एक फलंदाज धावबाद झाला.
𝐀 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐂𝐞𝐧𝐭𝐮𝐫𝐲 𝐟𝐨𝐫 𝐅𝐚𝐳𝐚𝐥 𝐇𝐚𝐪! 💯
Congratulations to our bowling sensation @fazalfarooqi10 for breaking the 100 wickets milestone in international cricket! He achieved this feat in his 75th inning, with a terrific average of 23.69. 👏#AfghanAtalan pic.twitter.com/GVMvLAZZWF
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 18, 2024
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात घातक गोलंदाजी करत एक विशेष टप्पा गाठला. डावखुरा वेगवान गोलंदाजाने या सामन्यात दुसरी विकेट घेताच पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये (T20I आणि ODI) 100 बळी पूर्ण केले. ही कामगिरी करण्यासाठी फारुकीला 75 डाव लागले. या काळात वेगवान गोलंदाजाची सरासरी 23.69 होती. सामन्यात फारुकीने कर्णधार एडन मार्करामला दोन धावांवर झेलबाद केले. फारुकीने मार्करामची विकेट घेताच अफगाणिस्तानच्या या तरुण वेगवान गोलंदाजाने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये (T20I आणि ODI) 100 बळी पूर्ण केले.
डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 42 टी-20 सामन्यांमध्ये 54 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आतापर्यंत 32 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आजच्या एकदिवसीय सामन्यात फारूकीने 2 विकेट घेत विशेष टप्पा गाठला. फारुकीला 100 विकेट पूर्ण करण्यासाठी 75 डाव लागले . या काळात फारुकी यांची सरासरी 23.69 होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आजच्या (18 सप्टेंबर 2024) पहिल्या एकदिवसीय सामन्यात फारुकीने 7 षटकांत 35 धावा देऊन चार विकेट घेतल्या आहेत.