Cricket Retirement News : वार्षिक करारातून वगळल्याने ‘या’ बड्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
आयपीएल २०२६ च्या १९व्या हंगामातील थरार सुरू असताना दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट विश्वात एक धक्कादायक (Cricket Retirement News) बातमी समोर आली आहे.

Cricket Retirement News : आयपीएल २०२६ च्या १९व्या हंगामातील थरार सुरू असताना दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट विश्वात एक धक्कादायक (Cricket Retirement News) बातमी समोर आली आहे.
प्रोटियाज संघाचा मधल्या फळीतील स्थिर फलंदाज रासी व्हॅन डर डुसेन (Cricket Retirement News) यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय अशा तिन्ही फॉर्मेटमधून एकाच वेळी निवृत्ती जाहीर केली आहे.
रासींनी सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची (Cricket Retirement News) घोषणा केली. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने (CSA) देखील त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
रासींनी आपल्या निवृत्तीच्या (Cricket Retirement News) पोस्टमध्ये लिहिले की, “दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणे ही माझ्यासाठी गर्वाची बाब होती.” त्यांनी आपल्या कारकीर्दीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. ते पुढे देशांतर्गत क्रिकेट (लायन्स संघ), फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार असून, पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले आहे.
वार्षिक करारातून वगळल्याने घेतला निर्णय
क्रिकेट साउथ आफ्रिकाने २०२६-२७ हंगामासाठी १ एप्रिल २०२६ रोजी वार्षिक (सेंट्रल) करार जाहीर केला. यात एकूण १९ खेळाडूंना स्थान देण्यात आले. मात्र, अनेक अनुभवी खेळाडूंना यातून वगळण्यात आले. रासी व्हॅन डर डुसेन यांचाही यात समावेश होता.
करारातून वगळल्यानंतर रासींनी तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. निवृत्तीमागील ठोस कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, मात्र बोर्डाच्या निर्णयामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
करारातून बाहेर पडलेले इतर खेळाडू
रासी व्यतिरिक्त लिझाड विलियम्स, नांद्रे बर्गर, डेव्हिड मिलर आणि गेराल्ड कोएत्झी या खेळाडूंनाही क्रिकेट बोर्डाने वार्षिक करारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
रासींची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
एकदिवसीय क्रिकेट : ७१ सामने
टी२० आंतरराष्ट्रीय : ५७ सामने
कसोटी : १८ सामने
त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ६ शतके झळकावली, त्यातील सर्व शतके एकदिवसीय क्रिकेटमध्येच. तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून त्यांनी जवळपास ५,००० धावा केल्या. रासी गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होते. ते अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट २०२५ मध्ये खेळले होते.
आयपीएलमधील कारकीर्द
आयपीएल स्पर्धेत रासींना फारशी संधी मिळाली नाही. त्यांनी एकूण ३ सामन्यांमध्ये २२ धावा केल्या. आयपीएलमध्ये त्यांचा अखेरचा सामना ११ मे २०२२ रोजी खेळला गेला होता.






