T20 World Cup 2026 : आयसीसी टी – 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2026) सुपर-8 टप्प्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला 76 रननी पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 187/7 धावा केल्या, तर भारत 111 धावांवर ऑलआउट झाला. या पराभवामुळे भारताचा नेट रनरेट (NRR) -3.800 पर्यंत घसरला आहे. तर दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला 107 रननी धूळ चारली. वेस्ट इंडिजने 254/6 धावा केल्या, तर झिम्बाब्वे 147 धावांवर ऑलआउट झाली. या विजयामुळे वेस्ट इंडिजचा नेट रनरेट +5.350 पर्यंत पोहोचला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा +3.800 आहे. सुपर-8 मधील सध्याची स्थिती – वेस्ट इंडिज: 2 गुण, NRR +5.350 – दक्षिण आफ्रिका: 2 गुण, NRR +3.800 – भारत: 0 गुण, NRR -3.800 – झिम्बाब्वे: 0 गुण, NRR -5.350 या निकालांमुळे भारत आता अडचणीत आला आहे. भारताला उरलेले दोन्ही सामने (झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध) मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. तरीही सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करावा, अशी परिस्थिती आहे. जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवले आणि भारताने दोन्ही सामने जिंकले, तर भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचे 4-4 गुण होतील. अशा वेळी नेट रनरेटमुळे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये जातील, कारण भारताचा NRR प्लसमध्ये आणणे जवळपास अशक्य आहे. झिम्बाब्वेविरुद्ध ‘डू ऑर डाय’ सामना गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी टीम इंडिया चेन्नईत झिम्बाब्वेविरुद्ध निर्णायक सामना खेळणार आहे. या सामन्यात टीममध्ये 2 बदल होण्याची शक्यता आहे. अभिषेक शर्मा वर्ल्ड कपमध्ये 3 सामन्यांत ० वर बाद झाला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही केवळ 15 रन केले. त्याच्या खराब फॉर्ममुळे संजू सॅमसनला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरली आहे. मात्र, बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्रांनुसार, अभिषेक आणि इशान किशन ओपनिंग करत राहतील, तर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. संजू सॅमसनला मिडल ऑर्डरमध्ये संधी मिळू शकते. तिलक वर्मा टॉप ऑर्डरमध्ये फॉर्म शोधत आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खराब शॉटमुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे तिलकऐवजी संजूला संधी मिळण्याची शक्यता आहे. टीम कॉम्बिनेशनची समस्या आणि संजूचा फायदा भारताच्या टॉप-8 मध्ये अभिषेक, इशान, तिलक, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि रिंकू सिंग हे सर्व डावखुरे फलंदाज आहेत. यामुळे टीमला उजव्या हाताच्या फलंदाजाची गरज आहे. संजू सॅमसन आल्यास सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याबरोबर उजव्या हाताचे तीन फलंदाज उपलब्ध होतील, ज्यामुळे बॅटिंग ऑर्डर अधिक मजबूत होईल. अक्षर पटेलचे कमबॅक निश्चित दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर अक्षर पटेल ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्याची चूक झाल्याचे टीम इंडियाने मान्य केले आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्ध अक्षरचे कमबॅक निश्चित मानले जात आहे. टीम इंडियाला आता मोठ्या विजयांसह नेट रनरेट सुधारणे आणि इतर निकालांवर अवलंबून राहणे भाग आहे. सेमीफायनलची आशा जिवंत ठेवण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे.