Jamkhed News : जामखेड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधून दुचाकीवरून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत एका पित्याचा जागीच मृत्यू झाला आहे. (Jamkhed News) ही घटना खर्डा गावापासून एक किलोमीटर अंतरावर घडली आहे. महादेव लक्ष्मण फरताडे (वय ४५, रा. गोसावीवाडी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे मृताचे नाव आहे. मुलीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Jamkhed News) याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महादेव लक्ष्मण फरताडे यांच्या मुलीचे लग्न ७ मे रोजी निश्चित झाले होते. खर्डा येथे कपड्यांचा बस्ता बांधून झाल्यानंतर ते आपल्या मोटारसायकलने (क्र. MH-25-4923) नातेवाईक अभिषेक चव्हाण यांच्यासह भूममार्गे गावाकडे निघाले होते. (Jamkhed News) Jamkhed News : कर्जत-जामखेडमध्ये वीजप्रश्नावर ठिय्या; रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, महावितरणचे आश्वासन खर्डा गावापासून काही अंतरावर आले असताना समोरून येणाऱ्या एका अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील मोटारसायकल (क्र. MH-16-8982) भरधाव वेगात चालवून फरताडे यांच्या गाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, महादेव फरताडे हे हवेत उंच उडून थेट रस्त्यावर आदळले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Jamkhed News) धडक दिल्यानंतर अज्ञात आरोपी चालक घटनास्थळावरून तातडीने फरार झाला. याप्रकरणी अभिषेक चव्हाण (वय १८, रा. वंजारवाडी, ता. जि. बीड) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Jamkhed News) ठाणे अंमलदार आर. डी. नागरगोजे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. खर्डा पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत व पोलीस हवालदार संभाजी शेंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (Jamkhed News) Jamkhed News : जामखेडमध्ये खळबळ! हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये नर्सची आत्महत्या; हातावर इंजेक्शनच्या खुणा गावावर शोककळा अवघ्या दोन दिवसांवर मुलीचे लग्न आले असताना, वडिलांचा असा अपघाती मृत्यू झाल्याने फरताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कपड्यांचा बस्ता घेऊन घरी परतणाऱ्या वडिलांचा मृतदेह घरी पोहोचल्याने संपूर्ण गोसावीवाडी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Jamkhed News)