‘फतेह’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; सोनू सूदसोबत दिसणार जॅकलिन फर्नांडिस

Fateh Release Date | अभिनेता सोनू सूदने ‘दबंग’, ‘हॅपी न्यू इयर’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह सोनू सुद त्याच्या सामाजिक कार्यामुळे देखील ओळखला जातो. नुकतेच त्याने त्याचा 51 वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याने ‘फतेह’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. सोनूने या चित्रपटात अभिनयसह दिग्दर्शनही केले आहे. सध्या त्याच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करत त्याने चाहत्यांना सरप्राइज दिले आहे.
सोनूने ‘फतेह’ चित्रपटाची रिलीज डेट इन्स्टाग्रामवर शेअर केली असून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आहेत. या चित्रपटात सोनू सूदसोबत मुख्य भूमिकेत जॅकलिन फर्नांडिस ही दिसणार आहे. नवीन पोस्टर शेअर करत त्याने चित्रपटाची रिलीज डेट सांगितली. ‘फतेह’ चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. जॅकलिन फर्नांडिसनेही हे पोस्टर शेअर ‘फतेह देशातील आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट देण्यासाठी तयार आहे.’ असे म्हंटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित, ‘फतेह’ मध्ये सोनू सूद नसीरुद्दीन शाह आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सोनू सूदचा ‘फतेह’ सायबर क्राइमच्या वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित आहे.
हेही वाचा :
वायनाडला जाणाऱ्या केरळच्या आरोग्यमंत्र्यांच्या कारला अपघात; रुग्णालयात दाखल





