कर्जत – कृषी विभागामार्फत राज्यभरातून घेण्यात आलेल्या पिक स्पर्धेत कर्जत तालुक्यातील निमगाव गागंर्डा येथील शेतकरी दिपक तुकाराम ढगे यांनी सन 2022-23 मध्ये खरीप हंगामात झालेल्या पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात उडीद पिकाच्या उत्पादनात ते राज्यात प्रथम आले आहेत. कृषी विभागामार्फत राज्यभरातून घेण्यात आलेल्या पिक स्पर्धेत ढगे यांच्या उडीद पिकाची उत्पादकता ही 33 क्विंटल हेक्टर इतकी आली होती. जिल्ह्यात ते उडिद उत्पादनात प्रथम आले होते. आता राज्यस्तरावर देखील ते प्रथमच आले आहेत. कृषी विभागाच्या सागर जवणे यांनी लागवडी संदर्भात वेळोवेळी केलेले अन्नद्रव्य व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापनविषयक मार्गदर्शन त्यांनी तंतोतंत राबवले. याचा त्यांना उत्पादनवाढीत फायदा झाला. तालुकास्तरावर प्रथम आल्याबद्दल 5 हजार, जिल्हास्तरावर प्रथम 10 हजार, राज्यात प्रथम 50 हजार या पद्धतीने एकूण 65 हजार रुपये पुरस्काराचे ढगे मानकरी ठरले. मुख्यमंत्री,पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव 6 मे रोजी होणाऱ्या खरीप आढावा बैठकीत त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तसेच लवकरच राज्यस्तरावर होणाऱ्या खरीप आढावा बैठकीत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.