पुणे जिल्हा | पोंदेवाडीसह सहा गावांमध्ये शेतकऱ्र्यांना ज्वारी बियाण्याचे वाटप

लाखणगाव (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी,धामणी,वडगावपीर ,मांदळेवाडी,पहाडदरा,खडकवाडी या गावांमध्ये अन्न व पोषण सुरक्षा अभियाना अंतर्गत आंबेगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने ज्वारी बियाण्याचे वाटप मोफत शेतकर्यांना करून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
पोंदेवाडी येथील ५० शेतकऱ्यांना प्रत्येकी चार किलो याप्रमाणे ज्वारी बियाणे वाटप व मार्गदर्शन करण्यात आले. पूर्व भागामधील गावांमध्ये ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. अशा गावांमध्ये आंबेगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने अन्न व पोषण सुरक्षा अभियान राबविण्यात आले.
या अभियान अंतर्गत तालुक्यातील पूर्व भागातील पोंदेवाडी,खडकवाडी, धामणी, पहाडदरा, वडगावपीर, मांदळेवाडी या गावांमध्ये ज्वारी बियाणे वाटप व प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ व मंडल कृषी अधिकारी सोपान लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू असुन पोंदेवाडी येथे यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, संदीप पोखरकर,
महेंद्र पोखरकर, अमोल वाळुंज, सोमनाथ वाळुंज,यांसह शेतकरी,महिला उपस्थित होते. कृषी विभागाचे कृषी सहाय्यक प्रवीण मिरके,प्रमोद भोर,सि.टी. शिंदे यांनी प्रात्यक्षिक व शेतकऱ्यांना ज्वारी पिकाबाबत मार्गदर्शन केले.





