शेतकऱ्यांना मिळाली ग्रेटभेट ! यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजनांची केली घोषणा?

Union Budget 2025 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अनेकांचे लक्ष लागलेल्या या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा या करण्यात आल्या आहेत. खासकरून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाख करण्यात आली आहे. याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पातू कृषी क्षेत्राला आणखी काय काय मिळाले. ते जाणून घेऊयात… Union Budget 2025
कृषी क्षेत्रासाठी कोणत्या योजना ?
– किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाख करण्यात आली आहे.
– कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर.
– 100 जिल्ह्यांमध्ये कृषी धनधान्य योजना राबवण्यात येणार.
– डाळींसाठी 6 वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजना लागू करण्यात येणार.
– शेतकऱ्यांसाठी सुलभकर्ज उपलब्ध करुन देण्यावर भर देणार.
– पारंपरिक सुती उद्योगाला प्रोत्साहन देणार.
– डेअरी आणि मत्स्यपालनासाठी 5 लाखांपर्यत कर्ज देणार.
– लघु उद्योगांद्वारे 7.5 कोटी रोजगार उपलब्ध करुन देणार.
– लघु आणि सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देणार.
– फळ भाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार.
– बिहारमध्ये मकाना बोर्डची स्थापना करण्यात येणार.
– मच्छिमारांसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन.
– अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन करण्यात येणार आहे.
– यूरीया निर्मितीत आत्मनिर्भरता, ईशान्य भारतात तीन कारखाने निर्माण करणार .





