Farmers Loan Waiver: तब्बल ९४ हजार शेतकरी कर्जमाफीतून बाद; पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून जमा होणार पैसे
Farmers Loan Waiver :

Farmers Loan Waiver: राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून तब्बल ९४ हजार प्राप्तिकर भरणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत. तर या योजनेतील उर्वरित १६ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात उद्या म्हणजेच मंगळवारी (4 ऑगस्ट ) एकाचवेळी तब्बल 7 हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत.
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली तेव्हाच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट केले होते. तसेच करदात्या शेतकऱ्यांची माहितीही केंद्र सरकारकडून मागवली होती. 31 लाख 64 हजार 28 शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी केली. त्यात 94 हजार शेतकरी हे करदाते असल्याचे समोर आले.
राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखाच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याची आणि नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली.

Farmers Loan Waiver: तब्बल ९४ हजार शेतकरी कर्जमाफीतून बाद; पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून जमा होणार पैसे
तसेच जर दोन लाखापेक्षा अधिक कर्ज थकबाकी असल्यास त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची दोन लाखांवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर एकवेळ समझोता अंतर्गत त्यांच्याही कर्ज खात्यात सरकार दोन लाख रुपये जमा करणार आहे. तसेच 2 लाख 90 हजार शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असून त्यांना 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
शेतकरी कर्जमाफीचे 7 हजार कोटी रुपये जमा केले जाणार
या शेतकऱ्यांनी आधारप्रमाणीकर (ई-केवायसी) केल्यानंतर त्यांच्या कर्जखात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत १० लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून येत्या दोन दिवसात आणखी शेतकरी आधार प्रमाणीकरण करतील. येत्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डीबीटीद्वारे या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात एकाचवेळी सुमारे सात हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. त्यानंतर शेतकरी जस जसे आधार प्रमाणीकरण करतील त्यानुसार त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.
हेही वाचा:





