Sharad Pawar : शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; दुष्काळी भागाचा करणार दौरा
Sharad Pawar : शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वी आमदार रोहित पवार यांची दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरुवात

Sharad Pawar : राज्यात बहुतांश भागात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहे. अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना आपापल्या भागातील दुष्काळी परिसरात जाऊन आढावा घेण्याचे आदेश दिले.
तसेच राज्य सरकारने 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचं जाहीर केलं आहे. मात्र, नुकसान झाल्यानंतर पंचनामे आणि त्यानंतर मिळणारी मदत यासाठी वेळ लागू शकतो, यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
यादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये ही मदत जाहीर करावी, अशी मागणी या पत्रात शरद पवार यांनी केली होती.
शरद पवार 28 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर
याशिवाय राज्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि पशुधनाची स्थिती यावर दररोज देखरेख ठेवण्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यानंतर आता शरद पवार स्वत: 28 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. Sharad Pawar
रोहित पवार यांची दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरुवात
शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरुवात केली आहे. ते मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. धाराशिवनंतर बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्येही त्यांनी पाहणी केली. रोहित पवार यांनीही शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना 25 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.
तसेच आज दिवंगत अजित पवार असते तर नियम आणि अटींमध्ये अडकले नसते, ते जनतेसाठी काम करणारे नेतृत्व होते. जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाणीव होती. मात्र, आज महायुतीतील नेत्यांना जनतेच्या प्रश्नांचे देणे-घेणे नाही, असे टीकाही रोहित पवार यांनी केली. Sharad Pawar
हेही वाचा:
IIT Bombay: आयआयटी मुंबई प्रशासन विद्यार्थ्यांपुढे झुकले ; १८ मागण्या मान्य अन् प्राध्यापक निलंबित





