Rohini Nilesh Paradhye : प्रसिद्ध रिलस्टारचं टोकाचं पाऊल; ज्या स्वयंपाकघरातून बनवले व्हिडिओ, तिथेच केला आयुष्याचा शेवट
Rohini Nilesh Paradhye : रोहिणी आणि तिचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावरील लोकप्रिय दाम्पत्य म्हणून ओळखले जात होते. दोघांनी मिळून ‘हॉटेल ग्रामपंचायत’ या नावाने व्यवसाय सुरू केला होता.

Rohini Nilesh Paradhye : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर आपल्या रील्समुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेली रील स्टार रोहिणी निलेश पाराध्ये हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, ज्या स्वयंपाकघरातून तिने अनेक लोकप्रिय व्हिडिओ तयार केले, त्याच ठिकाणी तिने आयुष्य संपवल्याने परिसरात आणि सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. रोहिणी आणि तिचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावरील लोकप्रिय दाम्पत्य म्हणून ओळखले जात होते. दोघांनी मिळून ‘हॉटेल ग्रामपंचायत’ या नावाने व्यवसाय सुरू केला होता. ग्रामीण जीवनशैली, गावरान खाद्यसंस्कृती आणि सामाजिक विषयांवर आधारित त्यांचे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. (Rohini Nilesh Paradhye )
हेही वाचा : Ankita Lokhande : अंकिता लोखंडे हिजाब घालण्यावरून ट्रोल; अबू धाबीमधील फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी सुनावले
सोशल मीडियावर त्यांनी आपला चाहतावर्ग तयार केला होता. त्यांना फॅालो करण्याऱ्यांची संख्याही मोठी होती. हॉटेलच्या स्वयंपाकघरात विविध पदार्थ बनवत असतानाचे त्यांचे व्हिडिओ इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र, त्याच स्वयंपाकघरात रोहिणीने गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
Rohini Nilesh Paradhye : प्रसिद्ध रिलस्टारचं टोकाचं पाऊल; ज्या स्वयंपाकघरातून बनवले व्हिडिओ, तिथेच केला आयुष्याचा शेवट
रोहिणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळताच तिचे पती निलेश पाराध्ये यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
रोहिणीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास मंगळवेढा पोलिसांकडून सुरू असून, तिच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Rohini Nilesh Paradhye )
दरम्यान, रोहिणीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली वाहत हळहळ व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Rakhi Sawant: ‘घर स्मशानासारखं वाटतं’; राखी सावंत पॉडकास्टमध्ये भावूक, भारती सिंहच्याही डोळ्यांत आले अश्रू





