‘कल्की २८९८ एडी’च्या दुसऱ्या भागात श्रीकृष्णच्या भूमिकेत दिसणार सुप्रसिद्ध अभिनेता?

Kalki 2898 AD Film | ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हासन या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका होती. या सिनेमात श्रीकृष्णाला खास पद्धतीने दाखवण्यात आले.
‘कल्की २८९८ एडी’च्या पहिल्या भागात श्रीकृष्णाची भूमिका कृष्णकुमार बालसुब्रमण्यम या कलाकाराने साकारली. आता दुसऱ्या भागात साउथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबू श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र ‘कल्की २८९८ एडी’चे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केली होती.
‘कल्की 2898 एडी’चे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते महाभारतातील दृश्यांचे चित्रण आहे, जे चित्रपटाला तपशीलवार पार्श्वभूमी देते. महाभारतातील ज्या पात्रांचा खुलासा झाला आहे, त्यात अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत तर मालविका नायर उत्तराच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय विजय देवरकोंडा चित्रपटात अर्जुनच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कल्की २८९८ एडी’ २०२६ ला रिलीज होण्याची शक्यता आहे. Kalki 2898 AD Film |
दरम्यान, ‘कल्की 2898 एडी या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, ब्रह्मानंदम, राणा डग्गुबती, पशुपती आणि राजेंद्र प्रसाद यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली सी अश्विनी दत्त या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. कमल हसन या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत असला तरी आगामी चित्रपटात त्याला अधिक स्थान देण्यात येणार आहे.
हेही वाचा:
संतोष देशमुख प्रकरणात CIDच्या हाती लागली मोठी माहिती; वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन ट्रॅक





