संतोष देशमुख प्रकरणात CIDच्या हाती लागली मोठी माहिती; वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन ट्रॅक

Valmik Karad Last Location | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या तीन दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहे.
या खून प्रकरणाशी संबंधित आतापर्यंत 100 जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून महत्वाची माहिती सीआयडीला मिळाल्याचे समजत आहे. यातच आता सीआयडीच्या हाती एक एक पुरावे लागत आहेत. Valmik Karad Last Location |
सीआयडीच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे
या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असणाऱ्या वाल्मिक कराडचा सीआयडी शोध घेत आहे. अशामध्ये वाल्मिक कराडच्या शोधात असलेल्या सीआयडीच्या हाती महत्वपूर्ण धागेदोरे लागले आहेत. सीआयडीला वाल्मिक कराडचे शेवटचं लोकेशन ट्रॅक करण्यात यश आले आहे. Valmik Karad Last Location |
फरार होण्यापूर्वी वाल्मिक कराड पुण्यात वास्तव्यास असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १७ डिसेंबरला वाल्मिक कराडचे शेवटचं ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात होतं. पुण्यातून फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती समोर येत आहे.
चार जणांची बँक खाती गोठवली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशनांतर वाल्मिक कराडसह 4 जणांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. कराडला अटक करण्यासाठी सीआयडीच्या 9 पथकाकडून शोध सुरू आहे. रविवारी रात्री उशिरा वाल्मिक कराडने पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांसमोर सरेंडर केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना वृत्त फेटाळून लावले. Valmik Karad Last Location |
दरम्यान, वाल्मिक कराडच्या अटकेसाठी सीआयडीकडून शोध सुरू आहे. अपहरण आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. याचदरम्यान त्याचं शेवटचं ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात दाखवण्यात आले. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या पत्नीची देखील सीआयडीने कसून चौकशी केली आहे.
तर दुसरीकडे, संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुन्ह्यात वापरलेल्या स्कार्पिओ कारमध्ये सीआयडीला दोन मोबाईल्स फोन सापडले. या फोनमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ शूट करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सीआयडीकडून सध्या याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
हेही वाचा:
शेतकऱ्यांकडून पंजाब बंदची हाक; 150 हून अधिक ट्रेन रद्द, अनेक मार्ग ठप्प…




