दीपिका पादुकोण ‘कल्की २८९८ एडी’मधून आऊट; कोणत्या अभिनेत्रीची लागणार वर्णी?

Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पादुकोणने ‘कल्की २८९८ एडी’ या बिग बजेट चित्रपटात काम केले होते. मात्र आता ती या चित्रपटाच्या सिक्वेलचा भाग असणार नाही. दीपिकाला या चित्रपटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यातच आता एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.
अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं नाव सुचवलं आहे. ‘बाहुबली’मधील या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. यानंतर आता ‘कल्की’च्या सिक्वेलमध्ये जर ही जोडी पुन्हा एकत्र आली तर चित्रपट आणखी यशस्वी होईल. त्यामुळे ‘कल्की २८९८ एडी’मध्ये प्रभाससोबत अनुष्का शेट्टी झळकणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र सध्या ही केवळ चाहत्यांची मागणी आहे.
निर्मात्यांनी अजून अनुष्का शेट्टी किंवा इतर कोणत्याही अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. दरम्यान दीपिका बाहेर पडल्यामुळे ‘कल्की २८९८ एडी’च्या सीक्वलच्या शूटिंगला ब्रेक लागला आहे.
दरम्यान, अनुष्का शेट्टीचे नाव प्रभाससोबत आधीही जोडले गेले आहे. दोघांच्या डेटिंगच्या बातम्या अनेकदा येत राहिल्या आहेत. मात्र या चित्रपटात आता प्रभाससोबत अनुष्का दिसणार का? याबाबत निर्माते काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा:





