Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका; दीड कोटींच्या बनावट गुटखा प्रकरणात नातेवाईकावर गुन्हा दाखल
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवाईत अकोल्यातील बनावट गुटखा प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवाईत अकोल्यातील बनावट गुटखा प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता अभिषेक गई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tukaram Mundhe)
अभिषेक गई हे भाजपचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक विनोद मापारी यांचे नातेवाईक असल्याने या कारवाईची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Tukaram Mundhe)
एफडीएच्या पथकाने अकोला एमआयडीसी परिसरातील दोन कथित गुटखा कारखान्यांवर छापे टाकून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तपासादरम्यान हे कारखाने गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली असून तो सध्या फरार आहे. (Tukaram Mundhe)
तपासात असेही समोर आले की, यापैकी एक कारखाना अभिषेक गई यांच्या मालकीच्या जागेत सुरू होता. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tukaram Mundhe)
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विनोद मापारी यांनी संबंधित गोदाम भाडेकरारावर दिले होते, मात्र तेथे गुटखा उत्पादन सुरू असल्याची आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असा दावा केला आहे. (Tukaram Mundhe)






