Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना व्हाॅईस रेस्टचा सल्ला; पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही
Supriya Sule : येत्या २० जुलैपासून संसदेचे वादळी पावसाळी अधिवेशन सुरू होत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

Supriya Sule : येत्या 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आणि लोकसभेत या मुद्द्यावर आवाज उठवणार असल्याचे सांगणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घशाला सूज आल्यामुळे त्यांना पूर्णपणे न बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (Supriya Sule)
त्यामुळे पुढील एक ते दोन आठवडे त्या भाषण किंवा मुलाखती देणार नसल्याचे सुळे यांनी स्वतः याबाबत समाज माध्यमावरून माहिती दिली आहे. सुळे यांना घशाचा त्रास सुरू झाल्याने पक्षाची भूमिका मांडण्याची मुख्य जबाबदारी आता दुसऱ्यांवर येऊ शकते. (Supriya Sule)
खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट शेअर करत म्हटले की, माझ्या घशाच्या आणि आवाजाच्या समस्येबाबत मी नुकतीच डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या घशात थोडी सूज असल्याचे निदान केले असून, मला पूर्णपणे व्हॉइस रेस्ट (आवाजाला पूर्ण विश्रांती) घेण्याचा सल्ला दिला आहे. (Supriya Sule)
यावर उपाय म्हणून मी व्हॉइस थेरपी घेणार आहे. पुढील 1-2 आठवडे भाषणे, मुलाखती व दीर्घकाळ बोलणे टाळण्याचा सल्ला मला देण्यात आला आहे, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन वांगचुक यांना पाठिंबा दिला होता. (Supriya Sule)
Supriya Sule : शरद पवारांचा गट एनडीएसोबत जाणार का? सुप्रिया सुळे सस्पेन्स संपवला





