Pune District : शिक्रापुरात मतीमंद मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
Updated On:

शिक्रापूर : येथील हिवरे रोड परिसरातील श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतीमंद मुलांची कृषी कार्यशाळा येथे मतीमंद मुलांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबिर झाले आहे.
श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतीमंद मुलांची कृषी कार्यशाळा येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 50 विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गाडेकर यांनी डोळ्यांची निगा कशी राखावी, याबाबतची माहिती उपस्थित विद्यार्थ्याना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत साळवे यांनी केले तर विकास खाडे यांनी आभार मानले.





