Gyanvapi masjid case : ग्यानवापी सर्वे अहवाल सादर करण्यास मुदतवाढ

वाराणसी – वाराणसी येथील ग्यानवापी मशीद संकुलाचा वैज्ञानिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी वाराणसी जिल्हा न्यायालयाने आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला आणखी एका आठवड्याची मुदतवाढ दिली आहे.
आधी निर्धारीत करण्यात आलेल्या योजनेसुनार पुरातत्व विभागातर्फे आज अहवाल सादर होणे अपेक्षित होते. परंतु या संबंधातील काही काम अद्याप अपुरे असल्याचे पुरातत्व विभागातर्फे नमूद करण्यात आल्यानंतर त्यांना जिल्हा न्यायाधिश ए. के. विश्वेश यांनी एक आठवड्याचा अतिरीक्त वेळ दिला.
या वादाच्या संबंधात पुरातत्व विभागाच्या वैज्ञानिक अहवालावर बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे या अहवालाला विशेष महत्व आहे. पुरातत्व विभाग नेमका काय अहवाल देणार याची देशभर उत्सुकता आहे. मुघल आक्रमकांच्या काळात हिंदुंचे प्राचीन मंदिर पाडून तेथे मुस्लिमांचे प्रार्थना स्थळ उभारण्यात आल्याचा दावा केला गेला आहे.





