नागपूरमधील सोलार कंपनीत मध्यरात्री स्फोट; एकाचा मृत्यू, १७ कामगार जखमी

Nagpur Solar Industries Blast | नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात १ कामगाराचा मृत्यू झाला असून १७ कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील ४ जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
सीबी वन या प्लांटमध्ये स्फोट होण्यापूर्वी काही प्रमाणात धूर निघत असल्याचे अनुभवी कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, सर्व कामगारांनी बाहेरच्या दिशेने धाव घेतली. मात्र संबंधित प्लांटमधील मयूर गणवीर हे वेळेत बाहेर पडू शकले नाही आणि तेवढ्यात स्फोट झाला.
स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की, प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांबपर्यंत उडाले आणि त्या मलब्याच्या आघाताने अनेक कामगार जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच पोलीस, अग्निशमन दलासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रात्री उशिराच घटनास्थळी दाखल झाले. Nagpur Solar Industries Blast |
सुरुवातीला घटनास्थळी काही वेळ पुन्हा स्फोट घडणार नाही, याची काळजी घेत वाट पाहण्यात आली, त्यानंतर कूलिंग ऑपरेशन करून मालब्याखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, सर्व जखमींना प्रथमोपचारानंतर नागपूरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सुरक्षेच्या कारणावरुन कंपनीच्या आत कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. Nagpur Solar Industries Blast |
हेही वाचा:
‘८ वर्षे उशिरा, पण…’ ; जीएसटी सुधारणांच्या निर्णयाचे विरोधकांकडून स्वागत मात्र…





