पुणे – भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे. त्यापैकीच एक सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज (दि. १५) शहरातील नवी पेठ विठ्ठल मंदीरात महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लाऊन ववसा दिला. मकर संक्रांतीला तीळगुळ खाण्याची/वाटण्याची पध्दत आहे.