“राजकीय नुकसान झाले तरी….”; धंगेकर करणार शिंदेंची गोची? समज दिल्यानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम

Ravindra Dhangekar : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनली आहे. सध्या पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हे प्रकरण राज्यात गाजत आहे. या प्रकरणावर शिवसेनेचे नेते रविंद्र घंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
वाढत्या गुन्हेगारीवर रविंद्र धंगेकरांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष्य केले. यानंतर याचे पडसाद महायुतीत पाहायला मिळाले. यामुळे महायुतीमधील नेत्यांमध्ये नाराजीची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत दंगा नको, असा सल्ला धंगेकरांना त्यांना दिला. मात्र, या सल्लानंतर रविंद्र धंगेकर यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रेयवरून लक्षात येते. यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देत मोठं विधान केले आहे.
भाजपला टोला
एका वृत्त वाहिनीसोबत बोलताना रविंद्र धंगेकर म्हणाले, मी वेळ पडल्यास पुणेकरांसाठी स्वत:चं राजकीय नुकसान करायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर एकनाथ शिंदे माझ्या पाठीशी आहेत त्यांनाही गुन्हेगारी नको आहे. भाजपचे नेते टीका करतात त्यांनी स्वतःला आरशात पाहावे, असा सणसणीत टोला त्यांनी भाजपला लगावला. शिंदे साहेबांशी माझी जी चर्चा झाली त्यावर मी सविस्तर बोलेन, अशीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली.
रवींद्र धंगेकरांनी केलेल्या विधानावर शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत बोलणे झाले असल्याचे सांगितले. महायुतीत दंगा नको, असे त्यांना सांगितल्याचे शिंदे म्हणाले. पण पुण्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. लेकीबाळींना व्यवस्थित फिरता आले पाहिजे. गोरगरीब जनतेला सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होता कामा नये, असे रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितल्याचे ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले….
रविंद्र धंगेकर यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. आपले नेते एकनाथ शिंदे आहेत रवींद्रजींच्या लक्षात येईना आपण आता काँग्रेसमध्ये नाहीये, आपण शिवसेनेत आहोत धनुष्यबाणसोबत आहोत.
हेही वाचा : ‘२०० टक्के टॅरिफ…’ ; आता भारत-पाकिस्तान युद्धबंदीबद्दल ट्रम्पचा मोठा दावा





