औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार बॉबी देओल, वाढदिवसादिवशी समोर आला नवीन चित्रपटातील हटके लूक

Bobby Deol New Movie: अभिनेता बॉबी देओल आज त्याचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या नवीन चित्रपटातील लूक समोर आला आहे. बॉबी देओल ‘हरि हर वीरा मल्लू’ या तेलुगु चित्रपटात भूमिका साकारणार असून, या सिनेमातील त्याचा लूक समोर आला आहे.
एकेकाळी बॉक्स ऑफिसवरून गायब झालेल्या बॉबी देओलने मागील काही वर्षात दमदार कमबॅक केला आहे. मागील 1-2 वर्षात बॉबीने रेस-3 मधून दमदार कमबॅक करत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. बॉबी आश्रम, क्लास ऑफ 83, रेस-3, लव हॉस्टेल, अॅनिमल आणि कंगुवा या चित्रपट-सीरिजमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची दाद मिळाली आहे. आता बॉबी देओल लवकरच देओल ‘हरि हर वीरा मल्लू’ या चित्रपटात दिसणार आहे.
Wishing the incomparable, the man of magnetic screen presence @thedeol a very Happy Birthday! – Team #HariHaraVeeraMallu ⚔️#HBDBobbyDeol 🔥
Power star 🌟 @PawanKalyan @AMRathnamOfl @AnupamPKher @AgerwalNidhhi @amjothikrishna @mmkeeravaani @ADayakarRao2 @Manojdft… pic.twitter.com/frklEumhjM
— Hari Hara Veera Mallu (@HHVMFilm) January 27, 2025
बॉबीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचा लूक शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये तो ओरंगजेबची भूमिका साकारत आहे. ‘हरि हर वीरा मल्लू’ हा चित्रपट वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला Sword vs Spirit असे नाव देण्यात आले आहे. हा चित्रपट तेलुगुसह विविध भाषांमध्ये रिलीज होईल.
‘हरि हर वीरा मल्लू’ हा चित्रपट 28 मार्चला मोठ्या पडद्यावर रिलीज होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश जगरलामुडी हे असून, या चित्रपटात बॉबी देओलसोबत पवन कल्याण, निधी अग्रवाल, अनुपम खेर या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहे. तसेच, बॉबी देओल लवकरच हाऊसफुल-5 चित्रपटातही झळकणार असून, हा चित्रपट जून 2025 मध्ये रिलीज होणार आहे.





