EPF New Update: – पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निधी (EPF) नियमांमध्ये मोठा बदल करत आता घर खरेदीसाठी केवळ तीन वर्षांत EPF खात्यातून ९०% पर्यंत रक्कम काढण्याची मुभा दिली आहे. पूर्वी ही सुविधा मिळण्यासाठी किमान पाच वर्षांची वाट पाहावी लागत होती. EPFमध्ये मोठा बदल – घर खरेदी, बांधकाम आणि EMI साठी वापर शक्य EPF योजना 1952 अंतर्गत सुधारित पॅरा 68-BD नुसार, सदस्य आता घर खरेदी, बांधकाम किंवा गृहकर्जाच्या हप्त्यांसाठी आपल्या भविष्य निधीतील ९०% रक्कम काढू शकतात. विशेष म्हणजे, ही सुविधा आयुष्यात एकदाच मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ ₹1 लाख UPI किंवा ATM द्वारे मिळणार EPFOने जून 2025 पासून आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सदस्यांना आपत्कालीन परिस्थितीत ₹1 लाख रक्कम UPI किंवा ATM द्वारे तात्काळ मिळू शकते. ही सेवा वैद्यकीय आपत्कालीन स्थितींसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. फास्ट ट्रॅक क्लेम सेटलमेंट – ५ लाखांपर्यंत ऑटो क्लेम मंजुरी EPFOने क्लेम सेटलमेंट प्रक्रियाही सुलभ केली आहे. आता ₹1 लाखऐवजी ₹5 लाखांपर्यंतचे क्लेम ऑटोमॅटिक पद्धतीने मंजूर होतील. पूर्वी २७ ओळख व सत्यापन निकष होते, ते आता केवळ १८ वर आणण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे ९५% प्रकरणांत केवळ ३ ते ४ दिवसांत क्लेम निपटले जात आहेत. लग्न, शिक्षण, उपचार यासाठीही रक्कम काढणे सोपे EPFमधून लग्न, शिक्षण, वैद्यकीय उपचारांसाठीही रक्कम काढणे आता अधिक सुलभ झाले आहे. सरकारने या बाबतीतही नियम सुलभ करून कर्मचार्यांना मोठा दिलासा दिला आहे. असंगठित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खास प्रोत्साहन योजना सरकारने असंगठित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ‘Employee-Linked Incentive Scheme’ मंजूर केली असून, याअंतर्गत EPFOशी जोडले गेलेले कर्मचारी सरकारी प्रोत्साहनाच्या लाभार्थी ठरतील. ही योजना लेबर ब्युरोच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. या EPFO च्या सुधारित सुविधा लाखो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणार आहेत. घराचे स्वप्न साकार करतानाच आता आपत्कालीन परिस्थितीतही आर्थिक मदत सहज मिळणार आहे.