Gill Retired Hurt : भारतीय क्रिकेटमध्ये १५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं! ८० धावांवर नाबाद असणाऱ्या गिलला सोडावं लागलं मैदान
Gill Retired Hurt : शुबमन गिलने ८० धावांची कॅप्टनला साजेशी खेळी साकारली. मात्र, एकाही इंग्लिश गोलंदाजाला बाद करता आले नाही, अशा गिलला दुर्दैवाने बाद न होताच मैदान सोडावे लागले.

Shubman Gill Retired Hurt IND vs ENG 1st ODI Edgbaston : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने ८० धावांची कॅप्टनला साजेशी खेळी साकारली. मात्र, एकाही इंग्लिश गोलंदाजाला बाद करता आले नाही, अशा गिलला दुर्दैवाने बाद न होताच मैदान सोडावे लागले. फलंदाजीदरम्यान त्याच्या पायाच्या स्नायूंमध्ये प्रचंड ताण (क्रॅम्प) आल्याने त्याला ‘रिटायर्ड हर्ट’ (दुखापतग्रस्त होऊन मैदान सोडणे) होऊन तंबूत परतावे लागले. एक मोठा फटका खेळल्यानंतर त्याच्या वेदना असह्य झाल्याने फिजिओच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आला.
तंदुरुस्तीचा गंभीर प्रश्न; १५ नोव्हेंबरचा ‘अनोखा’ शाप!
शुबमन गिलचे असे ऐन सामन्यात दुखापतग्रस्त होणे ही पहिलीच वेळ नाही. गेल्या दोन वर्षांत तो अनेकदा स्नायूंच्या त्रासाचा बळी ठरला आहे. यापूर्वी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये तो ७९ धावांवर असताना दुखापतग्रस्त होऊन बाहेर गेला होता. त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी, म्हणजे १५ नोव्हेंबर २०२५ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत केवळ ४ धावांवर असताना त्याच्या मानेचे स्नायू जकडले आणि त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या दुखापतीमुळे तो पुढील कसोटीही खेळू शकला नव्हता. त्यामुळे भारतीय कर्णधाराची घसरणारी तंदुरुस्ती आता बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
१५ वर्षांनंतर भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडले असे!
Shubman Gill is walking with a noticeable limp. It looks like the injury is quite serious. He might not come back out to bat😢 pic.twitter.com/7GWYuO2oZS
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) July 14, 2026
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तब्बल १५ वर्षांनंतर एखादा भारतीय फलंदाज ‘रिटायर्ड हर्ट’ झाला आहे. यापूर्वी २०११ मध्ये मनोज तिवारी शतक झळकावल्यानंतर दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता. वनडेत सर्वात आधी १९८३ मध्ये दिलीप वेंगसरकर यांना अशा प्रकारे मैदान सोडावे लागले होते. याशिवाय श्रीकांत, सचिन, गांगुली, अजय जडेजा आणि रोहित शर्मा देखील वनडेमध्ये रिटायर्ड हर्ट झाले आहेत.
गिल जाताच टीम इंडिया अडचणीत –
Shubman Gill has reached 80* runs and is unbeaten 👏 What a terrific innings he is playing 🙌 With TWO crucial wickets down of the legends Virat Kohli and Rohit Sharma, the Skipper stepped up himself. Played sensibly, didn’t slog, waited for the right ball, let go of good balls… pic.twitter.com/y1dSa4cNQm
— Aware Indian (@Aware_Indian7) July 14, 2026
शुबमन गिल मैदानातून बाहेर पडताच भारतीय संघाची लय बिघडली. त्याच्या पुढच्याच षटकात श्रेयस अय्यर दुर्दैवीरित्या धावबाद (Run Out) झाला, तर त्यापाठोपाठ आलेला केएल राहुल केवळ १ धाव काढून बाद झाला. गिलच्या जाण्याने मजबूत स्थितीत असलेली टीम इंडिया अचानक संकटात सापडली.





