England One-Day Cup 2023 : ‘पृथ्वी शॉ’ याचा पुन्हा शतकी धमाका..

लंडन : – भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सध्या रॉयल लंडन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे करंडक स्पर्धेत नॉर्थरम्प्टनशायर संघाकडून खेळताना अफलातून खेळी करत आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात द्विशतकी खेळी केलेल्या शॉ याने डरहॅमविरुद्धच्या लढतीत वादळी शतकी खेळी केली.
दुसऱ्या सामन्यात शॉ याने 244 धावांची विक्रमी द्विशतकी खेळी खेळली. कामगिरीत सातत्य राखत त्याने डरहॅमविरुद्धच्या सामन्यात नाबाद 125 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली.
डरहॅमविरुद्धच्या सामन्यात नॉर्थम्प्टनशायरच्या संघाला 199 धावांचे लक्ष्य पार करायचे होते. शॉ याने सुरुवातीपासूनच धडाकेबाज फलंदाजी केली.
या सामन्यात शॉ याने केवळ 76 चेंडूत 125 धावांची खेळी करताना 15 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी केली. नॉर्थरम्प्टनशायर संघाने 25.4 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले व विजय प्राप्त केला.





