Aakriti Prithvi Separation : “आता आमचे रस्ते वेगळे…”; क्रिकेटर पृथ्वी शॉचा साखरपुडा अखेर मोडला; अभिनेत्री आकृती अग्रवालने सांगितले कारण
Aakriti Prithvi Separation : पृथ्वी शॉची होणारी पत्नी आकृती अग्रवालने काही दिवसांपूर्वी इन्स्टा स्टोरी शेअर करुन खळबळ उडवून दिली होती, ज्यामध्ये तिने पृथ्वीवर अप्रत्यक्ष गंभीर आरोप केले होते.

Prithvi Shaw And Aakriti Agarwal Break Engagement After 6 Months Emotional Post : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा एकदा चर्चेत आला असून यावेळी तो मैदानाबाहेरील वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या घडामोडीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. पृथ्वी शॉ आणि त्याची होणारी बायको, अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल यांनी गुरुवारी परस्पर संमतीने साखरपुडा मोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. मार्च २०२६ मध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला होता; मात्र अवघ्या सहा महिन्यांच्या आतच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला. आकृतीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत या नात्याला पूर्णविराम दिल्याची अधिकृत पुष्टी केली.
‘आमचे विचार अन् परिस्थिती जुळत नाही’; आकृतीची भावूक पोस्ट! (Aakriti Prithvi Separation )
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना आकृतीने लिहिले, “अत्यंत जड अंतःकरणाने मी सांगू इच्छिते की, मी आणि माझा होणारा नवरा आता वेगळे होत आहोत. आयुष्याबद्दलचे आमचे विचार, जबाबदाऱ्या आणि सध्याची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांवर कितीही प्रेम किंवा आदर करत असलो, तरी आता आमच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत हे आम्ही स्वीकारले आहे.” तिने पृथ्वीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून चाहत्यांना या कठीण काळात वैयक्तिक गोपनीयतेचा (Privacy) आदर करण्याची विनंती केली आहे.
Indian cricketer Prithvi Shaw and Akriti Agarwal have mutually decided to part ways and end their engagement.#PrithviShaw #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/Zq4bSjjThQ
— Sportskeeda (@Sportskeeda) September 17, 2026
डेब्यू सामन्यात शतक ते संघाबाहेर; पृथ्वीची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात! (Aakriti Prithvi Separation)
एकेकाळी भारतीय क्रिकेटचा भावी सुपरस्टार मानल्या गेलेल्या पृथ्वी शॉने २०१८ मध्ये पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच झंझावाती शतक झळकावून इतिहास रचला होता. मात्र, खराब फिटनेस, सातत्याचा अभाव आणि मैदानाबाहेरील अनेक वादांमुळे तो राष्ट्रीय संघातून बाहेर फेकला गेला. भारतासाठी त्याने ५ कसोटी सामन्यांत ३३९ धावा, ६ वनडे सामन्यांत १८९ धावा केल्या आहेत, तर त्याला केवळ एक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळण्याची संधी मिळाली.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सची साथ; पुनरागमनाची प्रतीक्षा कायम! (Aakriti Prithvi Separation)
घरगुती क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता, तर आयपीएल २०२५ च्या लिलावात तो अनसोल्ड राहिला होता. अखेर आयपीएल २०२६ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर विश्वास दाखवत संघात स्थान दिले होते. क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी धडपडत असतानाच आता वैयक्तिक आयुष्यात नातं तुटल्यामुळे पृथ्वी शॉच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.





