England Cricket : पाक-न्यूझीलंड विरूध्दच्या मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, मार्क वुड वर्षभरासाठी संघाबाहेर! जाणून घ्या, कारण

Mark Wood Elbow Injury : इंग्लंड क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेमध्ये इंग्लंडला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वास्तविक, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडला एका वर्षासाठी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. वुडच्या कोपराला झालेली गंभीर दुखापत हे त्यामागचे कारण आहे. त्यामुळे मार्क वुड पुढील वर्षभरासाठी संघाबाहेर असणार आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) एक निवेदन जारी करून माहिती दिली की “वुडला त्याच्या उजव्या कोपराच्या हाडात तणावग्रस्त दुखापत आहे, ज्याची वैद्यकीय स्कॅनद्वारे पुष्टी झाली आहे त्यामुळे मार्क वुडला या वर्षातील उर्वरित सामन्यांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही .” ईसीबीने पुढे सांगितले की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान मार्क वुडला हाताचा कोपरा दुखत असल्याची जाणीव झाली होती.
Gutting news 💔
Mark Wood has been ruled out for the rest of the year following a right elbow injury.
Back stronger, Woody 💪
— England Cricket (@englandcricket) September 6, 2024
तसेच ओल्ड ट्रॅफर्ड येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मार्क वुड शेवटचा खेळला होता. यासोबतच वुडलाही उजव्या मांडीला दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तथापि, ईसीबीने सांगितले की वुड मांडीच्या दुखापतीतून बरा होत आहे आणि तो त्याच्या वैद्यकीय पथकासह पुनर्वसन प्रक्रियेवर काम करत आहे.
SCO vs AUS 2nd T20 : दुसऱ्या सामन्यातही स्कॉटलँड पराभूत, विजयासह ऑस्ट्रेलियाची मालिकेत 2-0 ने आघाडी…
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्यंत फीट होण्याची शक्यता…
मार्क वुडच्या दुखापतीचा इंग्लंडच्या आगामी कसोटी दौऱ्यावरही परिणाम होणार आहे. ईसीबीने पुष्टी केली आहे की, वुड ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान आणि डिसेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. त्याचे लक्ष्य इंग्लंडच्या पांढऱ्या चेंडूच्या भारत दौऱ्यासाठी आणि 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तंदुरुस्त राहण्याचे आहे.





