England Cricket : दिग्गज अष्टपैलू खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, समोर आलं ‘हे’ कारण….

England Cricket (Moeen Ali Retirement) :- इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या मोईन अलीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. ऑस्ट्रेलिया संघाबरोबर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात संधी न मिळाल्याने 37 वर्षांच्या मोईन आली हा निर्णय घेतला आहे.
मी 37 वर्षांचा असून या महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी मला संधी मिळाली नाही. मी देशासाठी खूप क्रिकेट खेळलो आहे. आता पुढच्या पिढीला संधी देण्याची वेळ आहे. मी माझे काम केले आहे, असे एका मुलाखतीमध्ये मोईन अलीने बोलताना सांगितले. कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि इंग्लंड क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट कीज यांच्याशी बोलून मोईनने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
अष्टपैलू असलेल्या मोईन अलीने विश्वकरंडक 2024 स्पर्धेत शेवटचा टी-20 सामना खेळला होता. गयाना येथे भारतीय संघाच्या विरोधात इंग्लंड संघाला पराभूत व्हावे लागले होते. मोईन अलीने वर्षभरापूर्वीच कसोटीतून निवृत्ती घेतली होती. तरी देखील तो ऍशेस मालिकेसाठी संघात सामील झाला होता. या मालिकेसाठी जॅक लीचच्या जागी त्याची निवड करण्यात आली होती.
Ashes winner. World Cup winner. Legend.
Thank you, Mo ❤️ pic.twitter.com/fOpFMnlOT4
— England Cricket (@englandcricket) September 8, 2024
या अष्टपैलू खेळाडूने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 68 कसोटी, 138 एकदिवसीय आणि 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना इंग्लंड संघासाठी 8 शतके, 28 अर्धशतकांसह 6 हजार 678 धावा करताना 366 गडी बाद केले आहेत.
इंग्लंड क्रिकेट संघात मोईन अलीचे योगदान खूप महत्त्वाचे होते. मोईन अलीच्या सहभागात इंग्लंडने ऍशेस मालिका जिंकली आहे. तसेच तो 2019 वनडे वर्ल्ड कप आणि 2022 टी20 वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाचाही भाग होता.
विराटची 10 वेळा केली ए शिकार….
आपल्या ऑफ स्पिनने मोईन अलीने जगभरातील फलंदाजांना अडचणीत आणले, ज्यामध्ये भारताचा महान फलंदाज विराट कोहलीचे नाव प्रामुख्याने घेतले जाऊ शकते. कोहलीने मोईनविरुद्ध खूप संघर्ष केला आणि तिन्ही प्रकारच्या क्रिकेट प्रकारामध्ये मोईन अलीनं कोहलीली एकूण 10 वेळा आऊट केले आहे. या काळात मोईनने कसोटीत सर्वाधिक 6 वेळा त्याला बाद केले.





