ENG vs NZ 3rd Test : कॅप्टन बेन स्टोक्सच्या निवृत्तीच्या दिवशीच इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव; न्यूझीलंडने ४० वर्षांनंतर ट्रेंट ब्रिजवर रचला इतिहास!
ENG vs NZ 3rd Test : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच किवी संघाने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करत तीन सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

ENG vs NZ 3rd Test Nottingham Result : टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड क्रिकेट संघाने यजमान इंग्लंडचा त्यांच्याच मायदेशात तब्बल १६० धावांनी दारूण पराभव करत तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी आपल्या नावावर केली आहे. नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव २१२ धावांवर गुंडाळला.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच किवी संघाने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करत तीन सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तसेच नॉटिंघमच्या मैदानावर कसोटी विजय मिळवण्याचा न्यूझीलंडचा ४० वर्षांचा प्रदीर्घ दुष्काळ संपला असून, यापूर्वी त्यांनी १९८४ मध्ये येथे विजय मिळवला होता. न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी ३७० धावांचे कठीण लक्ष्य दिले होते. पाचव्या दिवशी ४ बाद १०३ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडच्या फलंदाजांनी किवी गोलंदाजांसमोर नांगी टाकली.
३७० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची शरणागती!
A SERIES FOR THE AGES! 🇳🇿🔥
The smiles say it all. Tom Latham and his men silence England with a historic 2-1 series victory, ending the hosts’ 13-year unbeaten home series streak and adding another unforgettable chapter to New Zealand cricket.
📸: Sony LIV#ENGvNZ |… pic.twitter.com/rJeaCF0Yft
— CricTracker (@Cricketracker) June 29, 2026
अनुभवी जो रूट केवळ १८ धावांवर धावचीत झाला. विकेटकीपर जेमी स्मिथने ९१ चेंडूंत ६० धावांची एकाकी झुंज दिली, तर गस ॲटकिन्सनने १९ धावा करत स्मिथसोबत सातव्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. न्यूझीलंडकडून जाकारी फॉक्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर नॅथन स्मिथ आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात ४३८ धावा करून ८४ धावांची आघाडी घेतली होती आणि दुसरा डाव २८८/९ वर घोषित केला होता.
कर्णधार बेन स्टोक्सच्या कारकिर्दीचा पराभवाने शेवट –
Two early wickets!
Nathan Smith finds the outside edge of Emilio Gay and a sharp piece of work in the field by Henry Nicholls sees Joe Root run out.
4 wickets required to win.#ENGvNZ | 📸 @PhotosportNZ pic.twitter.com/9CK5xr2Rfy
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 29, 2026
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना ठरला. सामन्यादरम्यानच निवृत्तीची घोषणा करणाऱ्या स्टोक्सने आपल्या अखेरच्या डावात २० चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांसह ३६ धावा केल्या. सलामीवीर बेन डकेटनेही ३६ धावा केल्या. मात्र, या दोन्ही प्रमुख फलंदाजांच्या एक्झिटनंतर इंग्लंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला.
लॅथम, कॉनवे आणि डॅरिल मिचेलचे झुंजार शतक –
NEW ZEALAND CLINCH THE CROWE-THORPE TROPHY! 🇳🇿
1st Test: 🏴 Won by 115 runs
2nd Test: 🇳🇿 Won by 253 runs
3rd Test: 🇳🇿 Won by 160 runsA sensational comeback from New Zealand as they win the series 2-1 and lift the Crowe-Thorpe Trophy. Outstanding cricket from the Black Caps!…
— Rana Ahmad. (@AhmadRana056) June 29, 2026
किवी संघाच्या या ऐतिहासिक विजयाचा पाया पहिल्या डावात कर्णधार टॉम लॅथम (१५१) आणि डेव्हॉन कॉनवे (१५७) यांच्या शतकांनी रचला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात डॅरिल मिचेलच्या नाबाद १०० धावा आणि रचिन रवींद्रच्या ९६ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने सामन्यावर पूर्ण पकड मजबूत केली.





