Stokes Scolds Archer : इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीत तुफान राडा! भर मैदानातच कॅप्टन स्टोक्स आर्चरवर संतापला, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Stokes Scolds Archer : आर्चरचा हा रुसवा पाहून कर्णधार बेन स्टोक्स चांगलाच भडकला आणि त्याने भर मैदानावर सर्वांसमोर आर्चरला कडक शब्दांत सुनावले.

Ben Stokes Angry on Jofra Archer Shoaib Bashir Catch Drop : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम येथील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक धक्कादायक आणि तितकाच नाट्यमय प्रकार पाहायला मिळाला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावादरम्यान इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या एका कृतीने सर्वांनाच चकित केले. कीवी संघाची विकेट पडल्यानंतर संपूर्ण इंग्लंड संघ जल्लोष करत असताना आर्चर मात्र बाउंड्रीवर एकटाच उभा राहिला. आर्चरचा हा रुसवा पाहून कर्णधार बेन स्टोक्स चांगलाच भडकला आणि त्याने भर मैदानावर सर्वांसमोर आर्चरला कडक शब्दांत सुनावले.
मैदानावर अचानक घडलं नाट्य; स्टोक्सने आर्चरला सुनावलं –
ट्रेंट ब्रिज कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा डाव ४३८ धावांवर आटोपला. मात्र, १० वी विकेट पडण्यापूर्वी मैदानात एक मोठा ड्रामा झाला. इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीरच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडचा फलंदाज नॅथन स्मिथ बाद झाला. बशीरने स्वतःच्याच गोलंदाजीवर एक अप्रतिम कॅच पकडत आपली पहिली विकेट घेतली. ,विकेट पडल्यामुळे कर्णधार स्टोक्ससह इंग्लंडचे सर्व खेळाडू बशीरभोवती गोळा झाले आणि जल्लोष करू लागले.
This 23 second clip sums up Jofra Archer as a cricketer.
Has the heart of a pea and filled with arrogance.
Good on Ben Stokes to call him out and asking to celebrate the wicket with his teammates. Ben Stokes setting the right example as a captain and cricketer.
Cricket is a team… pic.twitter.com/cX9rJg9lX3— Troll cricket unlimitedd (@TUnlimitedd) June 27, 2026
परंतु, जोफ्रा आर्चर बाउंड्रीजवळ तसाच उभा राहिला. हे पाहताच स्टोक्सचा पारा चढला. त्याने भर मैदानात आर्चरला जोरात आवाज दिला आणि रागात टीम सेलिब्रेशनमध्ये येण्याचा इशारा केला. स्टोक्सचा आक्रमक अवतार पाहून शेवटी आर्चरला आपली जिद्द सोडावी लागली आणि तो अनिच्छेने संघाच्या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला.
बशीरवर का रागावला होता जोफ्रा आर्चर?
आर्चरने असे वागण्यामागे तरुण फिरकीपटू शोएब बशीर कारणीभूत होता. झाले असे की, बशीरने विकेट घेण्याच्या ठीक एक ओव्हर आधी जोफ्रा आर्चर गोलंदाजी करत होता. आर्चरच्या चेंडूवर फलंदाजाचा एक सोपा कॅच उडाला होता, जो शोएब बशीरच्या दिशेने गेला. मात्र, बशीरने तो सोपा कॅच सोडला, ज्यामुळे आर्चर प्रचंड संतापला होता.
आपल्या षटकात कॅच सोडणाऱ्या बशीरने पुढच्याच ओव्हरमध्ये स्वतः विकेट घेतली, म्हणूनच आर्चर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी पुढे गेला नव्हता. स्टोक्स ओरडल्यानंतर आर्चरने बशीरशी हस्तांदोलन केले आणि वाद मिटवला. मात्र, तोपर्यंत या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी आर्चरच्या या वागणुकीवर जोरदार टीका केली आहे.





