ENG vs IND Timings : भारतीय प्रेक्षकांसाठी ईसीबीचा मोठा निर्णय! भारत-इंग्लंड टी-२० मालिकेच्या वेळेत अचानक केला मोठा बदल
ENG vs IND Timings : ही मालिका सुरू होण्यापूर्वीच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सामन्यांच्या वेळेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

IND vs ENG T20I Series Match Timings Changed : भारतीय क्रिकेट संघ येत्या जुलै महिन्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या बहुप्रतीक्षित टी-२० मालिकेची सुरुवात १ जुलैपासून होणार आहे. मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सामन्यांच्या वेळेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील काही सामन्यांच्या वेळेत थेट बदल करण्यात आला आहे.
भारतीय प्रेक्षकांसाठी वेळ बदलली; ‘व्ह्यूअरशिप’ वाढवण्याचा प्रयत्न!
याआधी ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील ३ सामने भारतीय वेळेनुसार रात्री ११:०० वाजता सुरू होणार होते. मात्र, आता बीसीसीआय आणि ईसीबीने ब्रॉडकास्टर्सशी (सोनी स्पोर्ट्स आणि स्काई स्पोर्ट्स) चर्चा करून हा सामना एक तास आधी, म्हणजेच रात्री १०:०० वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये सहसा टी-२० सामने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता खेळवले जातात. परंतु, भारतीय प्रेक्षकांना रात्री उशिरापर्यंत जागण्याची गरज पडू नये आणि टीव्हीवरील ‘व्ह्यूअरशिप’ (प्रेक्षकसंख्या) वाढावी, यासाठी सामन्यांची वेळ बदलून ते थोडे लवकर सुरू केले जाणार आहेत.
फ्लडलाईट्सची पडणार नाही गरज; सर्व तिकिटे हातोहात विकली!
ECB have brought forward start times for England’s floodlit T20Is against India next month in order to maximise TV viewing figures
The three evening games in the five-match T20I series were initially scheduled to begin at 6.30pm local time (11pm IST), as announced by the ECB… pic.twitter.com/zFlMVNMb0i
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 8, 2026
या वेळेतील बदलामुळे क्रिकेट चाहत्यांना मैदानावर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळणार आहे. इंग्लंडमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री ९:०० वाजेपर्यंत सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे रात्री १०:०० वाजता सुरू होणारे हे सामने मैदानातील कृत्रिम दिवे (Floodlights) पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच संपण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्येच या सामन्यांची तिकीट विक्री सुरू केली होती. विशेष म्हणजे, वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यांची सर्व तिकिटे आधीच पूर्णपणे विकली गेली आहेत.
नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज!
६ जून रोजी बीसीसीआयने या दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणार आहे. तसेच, आयपीएल गाजवणाऱ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान देण्यात आले आहे. आता श्रेयस अय्यरच्या कप्तानीखाली भारताचा हा नवा संघ इंग्लंडला त्यांच्याच भूमीत कशी धूळ चारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





