Emerging Teams Asia Cup 2024 : टीम इंडियाचा ओमानवर दणदणीत विजय, उपांत्य फेरीत ‘या’ संघाचे असणार आव्हान…

Emerging Teams Asia Cup 2024 (IND vs OMAN) :- इमर्जिंग आशिया कप 2024 मध्ये भारताने ओमानचा 6 गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना ओमानने 5 गड्यांच्या मोबदल्यात 140 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 15.2 षटकांत 4 बाद 146 धावा करत लक्ष्य गाठले. भारताच्या विजयात सर्वात मोठे योगदान आयुष बडोनीचे होते. त्याने 51 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. त्याच्याशिवाय अभिषेक शर्मानेही 34 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
For his power packed 51(27), Ayush Badoni is awarded the Player of the Match 🏆
India A qualify for the Semi Finals 👏
Updates ▶️ https://t.co/74D7VIfQa1#OMAvINDA | #ACC | #MensT20EmergingTeamsAsiaCup pic.twitter.com/o6fyDktjFs
— BCCI (@BCCI) October 23, 2024
या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओमानची सुरुवात खराब झाली आणि संघाने 33 धावांवर 3 विकेट गमावल्या, परंतु त्यानंतर मोहम्मद नदीमने 41 धावा, वसीम अलीने 24 आणि हमाद मिर्झाने 28 धावा करत ओमानची धावसंख्या 140 च्या पुढे नेली. भारताकडून आकिब खान, रसिक सलाम, निशांत सिंधू, रमणदीप सिंग आणि साई किशोर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
विजयासाठी 141 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही कारण अनुज रावत अवघ्या 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अभिषेक शर्माने 15 चेंडूत (5 चौकार अन् 1 षटकार) 34 धावांची तर आयुष बडोनीने 27 चेंडूत (6 चौकार अन् 2 षटकार) 51 धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर कर्णधार तिलक वर्मा आणि रमनदीप सिंह या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत नेलं. यादरम्यान तिलकने 30 चेंडूत नाबाद 36 तर रमणदीप सिंहनं 4 चेंडूत नाबाद 14 धावा केल्या.
ICC Test Rankings : कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ, पंतने घेतली मोठी झेप तर विराट-रोहितला बसला फटका…
उपांत्य फेरीत भारत-अफगाणिस्तान भिडणार…
टीम इंडियानं ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 7 धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने यूएईचा 7 गडी राखून पराभव केल्यानंतर उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. आता भारतीय संघाने ओमानवर मोठा विजय नोंदवत ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. म्हणजेच आता 25 ऑक्टोबर रोजी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीत त्याचा सामना अफगाणिस्तान-अ संघाशी होणार आहे.





