“क्रिकेटच्या मैदानावर ‘ऑपरेशन सिंदूर'” ; आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकला धूळ चारल्यानंतर पंतप्रधानांचे खास ट्वीट

PM Modi on Asia Cup। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशिया कप २०२५ जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. सोशल मीडियाद्वारे संघाला विजयाबद्दल अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी, “पाकिस्तानला हरवून टीम इंडियाने क्रिकेटच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर राबवले” असे म्हणत भारतीय संघातील क्रिकेटर्सचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदींनी भारताच्या ऐतिहासिक विजयावर खास पोस्ट करत, “क्रिकेटच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकालही तसेच आहे. आमच्या क्रिकेटपटूंना खूप खूप शुभेच्छा.” असे म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. याचा दाखला देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने क्रिकेटमध्येही पाकिस्तानला चिरडून टाकले आहे. PM Modi on Asia Cup।
#OperationSindoor on the games field.
Outcome is the same – India wins!
Congrats to our cricketers.
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2025
शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. २०२५ च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला हरवण्याची ही तिसरी वेळ होती. स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा अभिषेक शर्मा अंतिम सामन्यात फक्त ५ धावा करून बाद झाला, परंतु यावेळी तिलक वर्मा यांनी नाबाद ६९ धावा देऊन संघाची सूत्रे हाती घेतली.
अंतिम सामन्यात, पाकिस्तानने सुरुवात चांगली केली आणि एकही विकेट न गमावता ८४ धावा केल्या. तथापि, लागोपाठ एकामागून एक विकेट पडल्या आणि पाकिस्तानचा संघ फक्त १४६ धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरादाखल, अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना कामगिरी करता आली नाही. तथापि, तिलक वर्माच्या ६९, संजू सॅमसनच्या २४ आणि शिवम दुबेच्या ३३ धावांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. PM Modi on Asia Cup।





