ICC Test Rankings : कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ, पंतने घेतली मोठी झेप तर विराट-रोहितला बसला फटका…

ICC Test Rankings 2024 :- भारताचा यष्टिरक्षक व फलंदाज ऋषभ पंतने विराट कोहलीला मागे टाकताना कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत त्याला तीन स्थानांचा फायदा झाला.
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने 99 धावांची तडाखेबंद खेळी केली होती. याचा फायदा ऋषभला झाला. दुसरीकडे विराट कोहलीने 70 धावांची खेळी करून देखील त्याचे एक स्थान घसरून तो आठव्या स्थानी पोहोचला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल सध्या चौथ्या स्थानी आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माचे देखील स्थान घसरले असून तो आता श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेसह संयुक्तपणे 15 स्थानावर आहे. आयसीसी क्रमवारीत इंग्लंडचा दमदार फलंदाज जो रुटने आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे. इंग्लंडचा जो रूट अजूनही अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन दुसऱ्या तर इंग्लंडचा हॅरी ब्रूक तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा रचिन रवींद्र आणि डेवोन कॉनवेनही कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. शतकी खेळीने रचिन रवींद्र 36 व्या स्थानावरून 18 व्या स्थानावर तर डेव्हॉन कॉन्व्हे 36 व्या स्थानी पोहोचला आहे.
IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता किती? जाणून घ्या, हवामान अहवाल…
गोलंदाजीत देखील न्यूझीलंडचा मॅट हेन्रीने क्रमवारीत 9 व्या स्थानावर तर विल्यम ओ’रुर्के 39 व्या स्थानावर स्थिरावला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान कायम राखले असून, अश्विन दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्या, ऑस्ट्रेलियाचा नेथन लॉयन व रवींद्र जडेजा संयुक्तरित्या सहाव्या स्थानी आहे.





