इमर्जिंग एशिया कप 2024: इंडिया ए चे पाकिस्तान ए पुढे 184 धावांचे आव्हान
Updated On:

India A vs Pakistan A : इमर्जिंग एशिया कप 2024 मध्ये भारताची इंडिया ए आणि पाकिस्तानची पाकिस्तान ए यांच्यातील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंडिया ए च्या कर्णधार तिलक वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना इंडिया ए संघाने 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 183 धावा केल्या. कर्णधार तिलक वर्माने संघाकडून सर्वाधिक 44 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. इतर फलंदाजांकडून मात्र अपेक्षित साथ मिळाली नाही.
इंडिया ए संघाने दिलेले 183 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तान ए संघाने सुरुवातीलाच दोन गडी गमावले आहेत.





