श्रीलंकेतील निवडणुका दोन महिने पुढे ढकलल्या
Updated On:

कोलंबो – श्रीलंका संसदेच्या सार्वत्रिक निवडणुका करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. श्रीलंकेत करोनाची बाधा फार मोठ्या प्रमाणात झालेली नसली तरी त्या देशातही आत्तापर्यंत या रोगाचे एकूण 295 रूग्ण आढळून आले आहेत. त्याची बाधा पसरण्याचा धोका असल्याने निवडणुकाच पुढे ढकलण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
आता ही निवडणूक 20 जून रोजी होईल, असे तेथील निवडणूक आयोगाने जाहीर केले. तथापि निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने श्रीलंकेच्या संसदीय प्रणालीत काहीं घटनात्मक पेच उद्भवण्याची शक्यता आहे. त्या संबंधात राष्ट्राध्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मत आजमवावे अशी सूचनाही निवडणूक आयोगाने त्यांना केली आहे. करोनामुळे सध्या श्रीलंकेतही राष्ट्रव्यापी टाळेबंदी सुरू आहे.





