Election Results 2026 : देशातील पाच राज्यांच्या मतमोजणीला सुरुवात; पहिले कल समोर…
Election Results 2026 : पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजप आघाडीवर

Election Results 2026 : आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यांमधील ८२३ जागांसाठी पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीचे कल समोर येऊ लागले असून पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर झाल्याचे दिसत आहे.
बंगालमधील सुरूवातीच्या कलानुसार टीएमसी आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत दिसत आहे. पोस्टल मतमोजणीमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भवानीपूरमध्ये ममता बनर्जी आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. हा भाजपा अत्यंत मोठा झटका म्हणावा लागणार आहे.
#WATCH तिरुचिरापल्ली(तमिलनाडु): तमिलनाडु विधानसभा चुनाव 2026 के लिए मतगणना शुरू हो गई है। pic.twitter.com/fmACJONvrd
— ANI_HindiNews (@AHindinews) May 4, 2026
तर आसाममध्ये भाजप पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर आहे. भाजपाची सुरूवात चांगली झाल्याचे बघायला मिळत आहे. आसाममध्ये भाजप १७ जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूत पहिला कल TVK च्या बाजूना लागला आहे.
केरळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे पहिले कल हाती
याशिवाय केरळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचेही पहिले कल हाती आले आहेत. येथे डाव्या आघाडीने आपले खाते उघडले आहे. काँग्रेस आघाडी म्हणजेच यूडीएफ (UDF) तीन आणि डावे ५ जागांवर आघाडीवर आहेत. केरळमध्ये कलानुसार काँग्रेस आघाडी पुढे दिसत आहे. येथे यूडीएफ ३२, एलडीएफ (LDF) २७ आणि एनडीए एका जागेवर आघाडीवर आहे. Election Results 2026
हेही वाचा:





