Maharashtra : निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयाचे शरद पवार गटाकडून स्वागत…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एसपी) शुक्रवारी भारतीय निवडणूक आयोगाच्या पिपाणी आणि तुतारी चिन्हे गोठवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले . भाजपमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे नुकसान झाले. आम्ही राज्य निवडणूक आयोगाचे आभारी आहोत. सत्याचा विजय झाला आहे. आमच्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी भाजपकडून तुतारीच्या चिन्हाचा गैरवापर करण्यात आला.
आमचे तुतारी वाजवणारा माणूस- चिन्ह आणि पिपाणी चिन्ह यामध्ये लोक गोंधळले होते. याचे उदाहरण म्हणजे सातारा मतदारसंघात आमचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाल्याचे दिसले. कारण मतदारांनी हेच राष्ट्रवादीचे चिन्ह आहे असे समजून ते दाबले, असा दावा राष्ट्रवादीचे (एसपी) राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केला.
साताऱ्यात शिंदे यांचा भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्याकडून ३२,३७१ मतांनी पराभव झाला. पिपाणी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवलेल्या अपक्ष उमेदवाराने ३७,०६२ मते मिळविली,जी विजयी उमेदवाराच्या मताधिक्क्यापेक्षा जास्त होती.
Maharashtra : विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवारांना मोठा दिलासा, निवडणूक आयोगानं घेतला मोठा निर्णय….
राष्ट्रवादी पवार गटाने निवडणूक मंडळाला ही समान चिन्हे काढून टाकण्यास सांगितले होते. निवडणूक आयोगाने १६ जुलैच्या आपल्या आदेशात पिपाणी आणि तुतारी ही चिन्हे गोठवली आणि त्यांना मुक्त चिन्हांच्या यादीतून काढून टाकले. लोकांना आता योग्य चिन्ह कळेल आणि ते राष्ट्रवादीला (एसपी) मोठ्या संख्येने मतदान करतील, असा विश्वास क्रास्टो यांनी व्यक्त केला.





