Maharashtra : विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवारांना मोठा दिलासा, निवडणूक आयोगानं घेतला मोठा निर्णय….

मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे शरद पवारांनी पिपाणी चिन्ह रद्द करावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. अखेर ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य करत पिपाणी आणि तुतारी ही मुक्तचिन्ह गोठवली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पिपाणी आणि तुतारी ही चिन्हे नसणार आहे.
लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट (तुतारी) या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मतं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी ट्रम्पेटला (तुतारी) ला मिळाली होती. लोकसभेला ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी असा करण्यात आला होता.
M3M ED Raid : ईडीने जप्त केली एम3एम रिअल इस्टेट ग्रुपची 300 कोटींची जमीन…
या विरोधात निवडणूक आयोगात पक्षाने दाद मागितल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने पिपाणी आणि तुतारी ही मुक्तचिन्हे गोठवल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी पत्राद्वारे माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगात ही चिन्ह गोठवण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती.





