Ajit Pawar : पुण्यातील एकतानगर जलमय; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

Ajit Pawar : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावासाने राज्यासह पुण्यातही थैमान घातलं आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात पावसाने कहर केला आहे. आज सकाळपासून पावसाने उसंती घेतली असली तरी धुव्वादार झालेल्या पावासामुळे मोठ्या प्रमाणावर खडकवासाला धरणातून विसर्ग करण्यात आला आहे.
यामुळे मुळामुठा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलं आहे. तसेच पावसाचे पाणी एकतानगर भागात शिरलं आहे. यामुळे आता एनडीआरफच्या जवानांकडून रेस्क्यू अॅापरेशन राबवून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. अशातच आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील घाटमाथा परिसरातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून, ज्या ठिकाणी पाणी शिरलं आहे तिथली नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानंतर आम्हीही वेदर रिपोर्ट पाहतो आणि त्यानुसार सूचना करत असल्याचे देखील पवार यावेळी बोलताना म्हणाले.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
ज्यांना खूपच गरज असेल तरच बाहेर पडा, अशा प्रकारचे आवाहन आम्ही करतो याचं कारण म्हणजे आम्ही हे कशावर बोलतो तर आम्ही वेदर रिपोर्ट पाहतो आणि त्यानुसार परिस्थिती पाहून सांगतो. पुढचे काही दिवस पावसाचे असणार आहेत. पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, यांचं कारण म्हणजे वरची सगळी धरणातून पाणी सोडल्यामुळे खडकवासला धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.यामुळे आता पुण्याचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि बाकीची यंत्रणांना अलर्ट राहिला सांगितलं आहे. काही भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. पूल पाण्याखाली गेले आहेत, कोणीही धोका पत्करू नये असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
…तर विसर्गात वाढ करणार
आज सकाळी ९ वाजता ३९,००० क्युसेक विसर्ग खडकवासाला धरणातून सुरू आहे. पुणे ग्रामीण आणि शहरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाण्यासाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे या चारही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पावसाचा जोर आणि धरणातील पाणी साठ्यात अशीच जर वाढ होत राहिली तर आणखी विसर्ग करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांनी दाखल केला अर्ज ; पंतप्रधान मोदी पहिले प्रस्तावक





