एकनाथ शिंदे विमानतळावर ताटकळले; पायलटचे विमान उडवण्यास नकार; नेमकं काय घडलं?

Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घडलेल्या जळगाव विमानतळावरील एका प्रसंगामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावरून मुंबईकडे परतत असताना त्यांना काही वेळ जळगाव विमानतळावरच ताटकळत रहावं लागलं.
त्याचं झालं असं की, एकनाथ शिंदे काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. आषाढी वारीनिमित्त संत मुक्ताईचा पालखी सोहळा पंढरपूर कडे प्रस्थान झाल्याने या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगर येथे आले होते.
जळगावमधील नियोजित दौरा उरकून एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर पोहचले होते. त्याठिकाणी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील त्यांच्यासोबत होते. यावेळी विमानाच्या पायलटने उड्डाण करण्यास नकार दिला. जवळपास 45 मिनिटे एकनाथ शिंदे यांना विमानतळावरच ताटकळत राहावे लागले.Eknath Shinde |
तब्येतीच्या कारणास्तव पायलटचा उड्डाण करण्यास नकार
गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी पायलटची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तब्येतीच्या कारणास्तव पायलटने उड्डाण करण्यास नकार दिला. सलग १२ तास पायलटने उड्डाण केल्यानं त्याला थकवा जाणवत होता. त्यामुळे तब्येतीचे कारण देत त्याने विमान उड्डाण करण्यास नकार दिला.
यावेळी गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी त्याची समजूत काढली. त्यानंतर स्वत: एकनाथ शिंदे यांनीही पायलटची समजूत काढली. या प्रकारामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचा ताफा विमानतळावरच अडकला होता. विमानतळावरील वेटिंग रुममध्ये सगळे ताटकळत बसले होते.
नेत्यांचा उडाला गोंधळ
पायलटच्या तपासणीसाठी यावेळी डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर पायलटची समजूत घालण्यात आली आणि त्याने विमान उड्डाण करण्यास होकार दिला. त्यानंतर वैमानिकासह एक असिस्टंट वैमानिक विमान घेऊन हे विमान मुंबईकडे रवाना झाले. मात्र पायलटने विमान उड्डाण करण्यास नकार दिल्याने विमानतळावर नेत्यांचा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले होते. Eknath Shinde |
हेही वाचा:





