Eknath Shinde : एकनाथ शिंदे दिल्लीला भेटायला गेले ‘ते’ बडे नेते कोण? राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरु

Eknath Shinde Delhi Tour : महाराष्ट्रात मत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक दिल्लीत दाखल झाल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे (Eknath Shinde) यांनी काल रात्री बड्या मंत्र्यांची भेट घेतली असल्याचीही चर्चा दिल्लीत रंगली आहे.
उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्लीत बड्या नेत्याची भेट घेतली असल्याची आहे. हे बडे नेते कोण हे खात्रीशीर सांगता येत नाही. परंतु ते गृहमंत्री अमित शहा असावेत असा अंदाज लावला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका आठवडापूर्वी दिल्ली दौऱ्यावर आले होते. आता अचानक शिंदे दिल्लीला आले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाचे म्हणजे, फडणवीस यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. याशिवाय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यातही बैठक झाली आहे. यामुळे, मंत्रिमंडळाच्या विस्तारासह तर्क वितर्क लढविले जात आहेत. शिंदे यांनी आज लोकसभा आणि राज्यसभेतील पक्षाच्या खासदारांची बैठक बोलाविली होती. तत्पूर्वी काल रात्री सुध्दा शिंदे यांनी खासदारांसोबत चर्चा केली होती.
मुंबई मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मुद्यावर यात चर्चा झाली असल्याचे समजते. शिवसेनेचे मंत्री वादात सापडले आहेत. शिवाय शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होणार आहे. या बड्या नेत्याच्या भेटीत या दोन्ही मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. शिंदे काल बड्या नेत्याची भेट घेण्यासाठी साध्या गाडीतून गेले होते. याबाबत कुणालाही कळणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती.





