Vinod Kambli Treatment : विनोद कांबळींच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले; औषधोपचारासह मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलणार

Vinod Kambli Treatment : विनोद कांबळी यांची ढासळती प्रकृती आणि मुलांच्या शिक्षणासंदर्भात चर्चा होताच एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ मदतीचा हात पुढे केला. याबाबत आनंद दुबे यांनी माहिती दिली.

Updated On:
Vinod Kambli Treatment : विनोद कांबळींच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले; औषधोपचारासह मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलणार

Deputy CM Eknath Shinde takes responsibility Vinod Kambli treatment children education : नव्वदच्या दशकात आपल्या झंझावाती फटकेबाजीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकणारे माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी कुटुंबासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईतील ‘नंदनवन’ निवासस्थानी ही सदिच्छा भेट पार पडली. गेल्या काही काळापासून ढासळती प्रकृती आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करणाऱ्या कांबळींच्या औषधोपचारासह त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता शिंदे कुटुंब आणि शिवसेनेने उचलली आहे.

कांबळी घराघरांत परिचित असलेला क्रिकेटपटू: आनंद दुबे

या महत्त्वपूर्ण भेटीनंतर शिवसेनेचे नेते आनंद दुबे यांनी माध्यमांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचा सविस्तर तपशील दिला. यावेळी बोलताना आनंद दुबे म्हणाले, “नव्वदच्या दशकातील अशा मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये विनोद कांबळी यांचे नाव येते, जे देशातील क्वचितच एखाद्या लहान मुलाला माहिती नसेल. ते घराघरांत परिचित आहेत. आज त्यांनी संपूर्ण कुटुंबासह भेट घेतली.”

एक सेकंदही विचार न करता मदतीचा हात पुढे

विनोद कांबळी यांची ढासळती प्रकृती आणि मुलांच्या शिक्षणासंदर्भात चर्चा होताच एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ मदतीचा हात पुढे केला. याबाबत माहिती देताना आनंद दुबे पुढे म्हणाले, “नदीम सरांनी विनोद कांबळी यांची प्रकृती गेल्या काही दिवसांत ठीक नसल्याचे आणि मुलांच्या शिक्षणाचा विषय मांडताच शिंदे साहेबांनी एक सेकंदही विचार केला नाही.”

औषधोपचार आणि शिक्षणात कोणतीही अडचण येऊ देणार नाही

माजी क्रिकेटपटूच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आजपासून कांबळी यांच्या सर्व औषधोपचारांची आणि आरोग्याची संपूर्ण काळजी शिंदे कुटुंब व शिवसेना कुटुंब घेईल, असे दुबे यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असा शब्दही शिंदे यांनी दिला आहे.

हेही वाचा – Suryakumar Yadav Reaction : रोहित पुन्हा मुंबईचा कॅप्टन होताच सूर्याची खास पोस्ट! पण २०२४ मधील ‘त्या’ तुटलेल्या हृदयावरून पेटला नवा वाद

फाउंडेशनकडून तात्काळ सहकार्य अन् मुलांना मोलाचा संदेश

या भेटीदरम्यान डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेनेच्या वतीने कांबळी कुटुंबाला आवश्यक ते सर्व सहकार्य तातडीने देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांबळींच्या मुलांशीही आपुलकीने संवाद साधला. तुम्ही सर्वांनी मन लावून शिकावे आणि वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असा प्रेरणादायी संदेश शिंदे यांनी त्यांना दिल्याचे आनंद दुबे यांनी सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Indian Womens Hockey Team : भारतीय महिला हॉकी संघाने उडवला चीनचा धुव्वा! विक्रमी चौथ्यांदा पटकावली आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी

2026-11-28 22:45:00

Indian Womens Hockey Team : भारतीय महिला हॉकी संघाने उडवला चीनचा धुव्वा! विक्रमी चौथ्यांदा पटकावली आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी

Suryakumar Yadav Reaction : रोहित पुन्हा मुंबईचा कॅप्टन होताच सूर्याची खास पोस्ट! पण २०२४ मधील 'त्या' तुटलेल्या हृदयावरून पेटला नवा वाद

2026-11-28 20:11:08

Suryakumar Yadav Reaction : रोहित पुन्हा मुंबईचा कॅप्टन होताच सूर्याची खास पोस्ट! पण २०२४ मधील 'त्या' तुटलेल्या हृदयावरून पेटला नवा वाद

Sunil Gavaskar Angry : "कालपासून मी सांगतोय पण...", चार सोपे झेल सोडल्यावर सुनील गावस्कर भडकले! 'त्या' मोठ्या चुकीवर ठेवलं बोट

2026-11-28 18:42:08

Sunil Gavaskar Angry : "कालपासून मी सांगतोय पण...", चार सोपे झेल सोडल्यावर सुनील गावस्कर भडकले! 'त्या' मोठ्या चुकीवर ठेवलं बोट

Rohit Sharma Reveals : 'ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते योग्यरीत्या पार पाडत नव्हते', रोहितने पुन्हा मुंबईची कॅप्टन्सी स्वीकारण्याबद्दल केला खुलासा

2026-11-28 18:00:00

Rohit Sharma Reveals : 'ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते योग्यरीत्या पार पाडत नव्हते', रोहितने पुन्हा मुंबईची कॅप्टन्सी स्वीकारण्याबद्दल केला खुलासा

R Ashwin Statement : 'रोहित असो वा हार्दिक, निकाल तोच!' मुंबई इंडियन्सच्या नव्या निर्णयावर अश्विनचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

2026-11-28 17:14:58

R Ashwin Statement : 'रोहित असो वा हार्दिक, निकाल तोच!' मुंबई इंडियन्सच्या नव्या निर्णयावर अश्विनचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
Vinod Kambli Treatment : विनोद कांबळींच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले; औषधोपचारासह मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलणार - Dainik Prabhat