Sunil Gavaskar Angry : “कालपासून मी सांगतोय पण…”, चार सोपे झेल सोडल्यावर सुनील गावस्कर भडकले! ‘त्या’ मोठ्या चुकीवर ठेवलं बोट
Sunil Gavaskar Angry Video : न्यूझीलंडच्या डावात झेल सोडल्याबद्दल सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आणि क्षेत्ररक्षकांना काही पावले पुढे उभे राहण्याचा सल्ला दिला.

Sunil Gavaskar Angry on India drop four catches against New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च कसोटीत भारतीय संघाच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. पहिल्या डावात भारताने तब्बल चार सोपे झेल सोडले, ज्याचा फायदा घेत न्यूझीलंडने ३५६ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या दिवशीही क्षेत्ररक्षकांच्या चुका पाहून समालोचन करणारे सुनील गावस्कर संतापले. समालोचनादरम्यान हात आपटत त्यांनी व्यक्त केलेल्या संतापाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वेलिंग्टनपाठोपाठ क्राइस्टचर्चमध्येही झेल सोडल्याचा मोठा फटका –
संपूर्ण न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय क्षेत्ररक्षणाचा प्रश्न सातत्याने चर्चेत राहिला आहे. यापूर्वी वेलिंग्टन येथील पहिल्या कसोटीतही भारताने दोन अत्यंत महत्त्वाचे झेल सोडले होते. पहिल्या डावात जीवदान मिळताच हेन्री निकोल्सने १७५ धावांची मोठी खेळी साकारली. तर दुसऱ्या डावात डॅरिल मिचेलचा झेल सुटल्याने त्याने मोठी खेळी करत न्यूझीलंडला सामना अनिर्णित राखण्यात मोलाची मदत केली होती.
केएळ राहुलच्या पुढे चेंडू पडताच गावस्करांचा संयम सुटला –
The passion is still as fierce as ever! 💙
Sunny G can’t help but react as the catch falls just short at slip.
He’s been asking for that fielder to come a yard closer since yesterday evening! 😬
Watch the HERO VIDA India Tour of New Zealand 2nd Test, Day 2, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.
#SonySportsNetwork #SonyLIV #NZvIND
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 28, 2026
क्राइस्टचर्चमधील दुसऱ्या दिवसाच्या खेळात आकाश दीपच्या चेंडूवर किवी फलंदाजाच्या बॅटची कड घेत चेंडू स्लिपमध्ये गेला. मात्र, केएल राहुलच्या अगदी पुढ्यातच चेंडू पडल्याने झेलची संधी हुकली. हे चित्र पाहून गावस्कर यांचा संयम सुटला आणि त्यांनी हवेत ठोसे मारत उघड नाराजी व्यक्त केली. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्यांनी आपल्या या नाराजीमागचे नेमके कारणही स्पष्ट केले.
क्षेत्ररक्षकांच्या चुकीच्या जागेवर गावस्करांची तीव्र नाराजी
Sunil Gavaskar’s reaction after Rishabh Pant got dismissed 🤣🤣🤣🤣😂😂😂 https://t.co/siDqQZ1aud
— Troll cricket unlimitedd (@TUnlimitedd) November 28, 2026
झेल सुटणे खेळाचा भाग असल्याचे मान्य करत गावस्कर म्हणाले, “क्लबप्रमाणे कसोटीतही सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांकडून सोपे झेल सुटतात, त्यामुळे कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. पण कालपासून मी सातत्याने सांगतोय की क्षेत्ररक्षकांनी काही पावले पुढे उभे राहायला हवे होते. काही झेल सोपे नव्हते, मात्र योग्य जागी उभे राहिले असते तर ते घेता आले असते.”
छोट्या गोष्टींचे महत्त्व अन् बहुतुलेंकडून संघाची पाठराखण –
Stumps on Day 2.
#TeamIndia reach 116/6 at close of play, trailing by 240 runs.
Action resumes tomorrow at 3:30 AM IST.
Scorecard ▶️ https://t.co/6iCwvH4Zap
#NZvIND https://t.co/jMKsWtfdfR
— BCCI (@BCCI) November 28, 2026
ते पुढे म्हणाले, “एक सोपा झेल सुटला, तर दुसरा कठीण होता; पण छोट्या गोष्टी योग्य केल्यानेच मोठे यश मिळते.” दुसरीकडे, पत्रकार परिषदेत फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी भारतीय क्षेत्ररक्षणाची बाजू घेतली. मात्र, वारंवार पुनरागमनाची संधी देत न्यूझीलंडला ३५६ धावा करू दिल्याने भारताच्या क्षेत्ररक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरणार आहे.





