Indian Womens Hockey Team : भारतीय महिला हॉकी संघाने उडवला चीनचा धुव्वा! विक्रमी चौथ्यांदा पटकावली आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी
Indian Womens Hockey Team : भारतीय महिला हॉकी संघाने भोपाळमध्ये चीनला ३-१ ने पराभूत करून विक्रमी चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.

Indian women’s hockey team win a record fourth Women’s Asian Champions Trophy title 2026 : आणखी एका मोठ्या जेतेपदासह २०२६ हे वर्ष भारतीय महिला हॉकी संघासाठी अविस्मरणीय ठरले आहे. भोपाळमध्ये २८ नोव्हेंबरला झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने चीनचा ३-१ असा पराभव करत विक्रमी चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. यासह स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा संघ बनत भारताने जेतेपदाची हॅट्ट्रिक साधली आणि संपूर्ण स्पर्धेत आपली अजेय मोहीम कायम राखली.
दुसऱ्या सत्रात भारताचा जोरदार पलटवार, दीपिका सामनावीर
अंतिम सामन्याच्या पहिल्या सत्रात चीनने आघाडी घेत भारतीय संघावर दबाव टाकला होता. भारताच्या पासिंगमध्ये ताळमेळाची काहीशी कमतरता दिसली आणि चीनने मोकळेपणाने खेळू दिले नाही. मात्र, दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट ताळमेळ साधत सतत आक्रमण केले आणि चीनच्या बचावफळीला खिंडार पाडले. भारताकडून दीपिकाने दोन, तर इशिकाने एक गोल केला. यासह दीपिका सामनावीर ठरली.
स्पर्धेत दहा गोलांसह दीपिका ठरली अव्वल मानकरी –
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒! 𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐌𝐀𝐃𝐄! 🇮🇳🏆
A stunning 3-1 victory over China seals the title as India successfully defend their crown and create history with a record-breaking FOURTH Women’s Asian Champions Trophy triumph! 😍🥳
With four titles, including a hat-trick, India become the most successful team in the history of the competition! 🙌🔥
2016, 2023, 2024, 2026
#HockeyIndia #IndiaKaGame #MPAsianCT2026 #HockeyIsBack #NamasteAsia
— Hockey India (@TheHockeyIndia) November 28, 2026
अंतिम लढतीत दोन निर्णायक गोल करणाऱ्या दीपिकाने संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळवला. तिने स्पर्धेत एकूण १० गोल नोंदवले, ज्यामध्ये नऊ पेनल्टी कॉर्नर आणि एका मैदानी गोलाचा समावेश आहे. यापूर्वी साखळी फेरीच्या सामन्यातही भारतीय महिलांनी चमकदार खेळ करत चीनचा ६-२ असा दारुण पराभव केला होता.
२०२६ मध्ये भारतीय महिला हॉकीची ऐतिहासिक कामगिरी –
𝐀 𝐘𝐄𝐀𝐑 𝐓𝐇𝐀𝐓 𝐖𝐈𝐋𝐋 𝐆𝐎 𝐃𝐎𝐖𝐍 𝐈𝐍 𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘! 🇮🇳🏆
Asian Games Gold after 44 years, FIH Nations Cup champions, their best-ever FIH World Cup finish (5th) in 52 years, qualification for the LA 2028 Olympics and a historic rise to World No. 4 in the FIH Rankings! 🔥
And now, the Indian Women’s Team cap off an incredible 2026 by winning a record fourth Women’s Asian Champions Trophy title! What a year for Indian women’s hockey! 🏑❤️
#HockeyIndia #IndiaKaGame
— Hockey India (@TheHockeyIndia) November 28, 2026
भारतीय महिला हॉकीसाठी यंदाचे वर्ष अनेक ऐतिहासिक यशाचे साक्षीदार ठरले आहे. संघाने तब्बल ४४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याशिवाय एफआयएच नेशन्स कपचे विजेतेपदही पटकावले. एफआयएच महिला हॉकी विश्वचषकात ५२ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी करत पाचवे स्थान मिळवले. या कामगिरीच्या जोरावर लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकचे तिकीटही निश्चित केले.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरून ऐतिहासिक चौथ्या स्थानी झेप –
यंदा जागतिक क्रमवारीतही भारताने सातत्याने प्रगती साधली. वर्षाच्या सुरुवातीला नवव्या स्थानी असलेला संघ ऑगस्टमध्ये विश्वचषकानंतर आठव्या, तर ऑक्टोबरमध्ये आशियाई सुवर्णपदकानंतर सातव्या स्थानी पोहोचला. भोपाळमध्ये चीनला ६-२ हरवून पाचवे आणि जपानवर ४-० च्या विजयासह भारताने इतिहासात प्रथमच चौथे स्थान गाठले. विक्रमी चौथ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसह भारतीय महिलांनी २०२६ चा शानदार समारोप केला.





