Eknath Shinde : “सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचा”; तात्काळ पंचनाम्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
Eknath Shinde : पावसाच्या दीर्घ खंडामुळे राज्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी अत्यंत बिकट संकटात सापडला आहे.

Eknath Shinde : पिके पावसाअभावी गेली आहेत, शेतकरी संकटात आहेत. बळीराजा अन्नदाता आहे, अशात सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचा आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. (Eknath Shinde)
कॅबिनेटमध्ये दुष्काळावर चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे यावर चर्चा केली. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. (Eknath Shinde)
मुख्यमंत्री काही भागात स्वत: जातील. मी देखील काही भागात पाहाणी दौरा करणार असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकर्यांना संकटातून बाहेर काढणे आमचे काम आहे. आम्ही अनेक वेळेस मदत केली आहे, मदतीच्या आकडेवारीत मी जात नाही. (Eknath Shinde)
दसरा दिवाळीत संकट आले, अतिवृष्टी आली तेव्हा देखील आम्ही मदत केली. सरकार गंभीर आहे, मंत्री महोदयांनी त्याची दखल घेतली आहे. अधिकारी बांधावर जाईल आणि नुकसान झाले आहे ते मोजले जाईल आणि पंचनामे केले जातील. केंद्राने देखील वारंवार मदत केली असल्याचे शिंदे म्हणाले. (Eknath Shinde)
Eknath Shinde : ‘विरोधकांच्या पोटदुखीवर एखादं झाड शोधतो!’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा मिश्किल टोला
Eknath Shinde : मोठी बातमी . .! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड






